Crime News: मागील महिन्यातच उत्तर प्रदेशातील बिजनौर येथून दोन दोन अल्पवयीन तरुणी बेपत्ता झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. अखेर, 24 दिवसांनंतर या दोन्ही तरुणींना पंजाबच्या लुधियाना येथून सुखरूपपणे ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी त्यांना कपड्याच्या एका फॅक्टरीमध्ये काम करताना पकडलं. दोघींनी स्वतंत्र जीवन जगण्याच्या इच्छेमुळे घर सोडलं. क्राइम पेट्रोल बघून त्यांनी मिळून पळून जाण्याची योजना आखली.
ADVERTISEMENT
क्राइम पेट्रोल बघून पळून जाण्याचा प्लॅन...
बिजनौरमधील एका गावातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुली 24 दिवसांनंतर, पोलिसांना सापडल्या आहेत. त्या मंगळवारी पंजाबमधील लुधियाना येथे कपड्याच्या एका कारखान्यात सापडल्या. घरातील कुटुंबियांच्या बंधनांना कंटाळून त्या दोघी स्वतंत्र जीवन जगण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. क्राईम पेट्रोल ही टीव्ही मालिका पाहून त्यांनी पळून जाण्याचा कट रचला होता. 15 नोव्हेंबर रोजी दोन्ही तरुणी शाळेत जाण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर निघल्या आणि नंतर पुन्हा घरी आल्याच नाहीत.
हे ही वाचा: खेळत असताना 6 वर्षांच्या मुलीला उचलून नेलं अन् शेतात नेऊन लैंगिक अत्याचार! 'त्या' अवस्थेत सोडून फरार...
रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून माहिती...
शेतकरी संघटना आणि कुटुंबियांनी पोलिसांकडे बेपत्ता झालेल्या तरुणींचा शोध घेण्याची मागणी केली आणि महिला आयोगही पोलिसांवर दबाव आणत होता. दरम्यान, फोनचा वापर सुद्धा न झाल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणींनी आधी बिजनौरहून सहारनपूर येथे जाण्यासाठी एक बस पकडली. तिथून वांद्र्याला जाणाऱ्या ट्रेनमधून त्या गुजरतच्या सूरतमध्ये उतरल्या. त्यानंतर, दोघी अजमेरच्या ट्रेनमधून रतलाम येथे गेल्या. तरुणी तिथे काही वेळ थांबल्या आणि जम्मूच्या ट्रेनमधून पंजाबच्या लुधियाना येथे पोहोचल्या. तब्बल 66 ते 67 रेल्वे स्थानकांवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलिसांनी त्या दोघींची माहिती मिळवली.
हे ही वाचा: बाण, बांबू आणि ब्लेडने केली जाते प्रसूती, महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार
घरातील बंधनांमुळे पळून गेल्या
20 नोव्हेंबर रोजी लुधियाना येथे पोहोचून तरुणींनी कपड्याच्या एका फॅक्टरीमध्ये नोकरी करण्यास सुरूवात केली. प्राथमिक चौकशीवरून, दोघींकडे खर्चासाठी केवळ 2000 रुपये होते आणि त्यातील एका तरुणीच्या कानात सोन्याचे झुमके असून ते त्यांनी विकले होते. ग्रॅज्युएशननंतर लग्न करण्याचा दबाव आणि घरातील निर्बंध ही त्यांच्या पळून जाण्यामागची मुख्य कारणे होती. आता, दोघींनाही कोर्टात सादर केलं जाणार आहे.
ADVERTISEMENT











