बाण, बांबू आणि ब्लेडने केली जाते प्रसूती, महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

मुंबई तक

Nandurbar News : यातील धक्कादायक बाब म्हणजे बाण, बांबू आणि शेविंग ब्लेड यांसारख्या साहित्याचा वापर करुन प्रसुती केली जात आहे. शिवाय त्याची कोणत्याही प्रकारच्या शासकीय कागदावर नोंद केली जात नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

Nandurbar News
Nandurbar News
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बाण, बांबू आणि ब्लेडने केली जाते प्रसूती

point

महाराष्ट्रातील धक्कादायक प्रकार

Nandurbar News : राज्यातील गरोदर माता व नवजात बालकांच्या मृत्यूचा दर कमी व्हावा म्हणून शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च केला जात आहे. मात्र, दुर्गम भागांमध्ये आजही शासनाच्या योजना पोहोचल्या नसल्याचे भीषण वास्तव नंदुरबारमधून समोर आले आहे. नंदुरबारच्या धडगाव, अक्कलकुवा यांसारख्या दुर्गम भागांमध्ये आजही बाण, बांबू आणि ब्लेडच्या सहाय्याने महिलांची प्रसूती केली जात असल्याचा प्रकार समोर आलाय.

शासकीय कागदावर नोंद केली जात नसल्याची स्थानिकांची माहिती 

देशाला स्वातंत्र्य मिळून सात दशकांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. या जवळपास 75 वर्षांच्या स्वतंत्र भारताने मोठ्या प्रमाणावर प्रगती केली. यामध्ये शासनाने देखील विविध कल्याणकारी योजना राबवत यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात आजही शासनाच्या योजना पोहोचल्या नसल्याचं वारंवार अधोरेखित होत आहे. असाच एक धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. नंदुरबारच्या अक्कलकुवा, धडगाव या भागामध्ये आजही पुरुषदायींकडून महिलांची प्रसूती केली जाते. यातील धक्कादायक बाब म्हणजे बाण, बांबू आणि शेविंग ब्लेड यांसारख्या साहित्याचा वापर करुन प्रसुती केली जात आहे. शिवाय त्याची कोणत्याही प्रकारच्या शासकीय कागदावर नोंद केली जात नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा : जालना : नायब तहसीलदारांच्या टेबलवर फेकले पैसे, लाच मागितल्याने हायहोल्टेज ड्रामा; पाहा व्हिडीओ

तर दुसरीकडे आरोग्य विभाग आपल्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंद सक्षमपणे आणि नियमितपणे करत असल्याचा दावा जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून करण्यात आलाय. चालत आलेल्या जुन्या चालीरीतींमुळे काही ठिकाणी पुरुषदायींच्या मदतीने प्रसूती केली जात असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आल आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp