Thane Murder Case : ठाणे जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका महिलेचं छाटलेलं मुंडक आढळल्याने परिसरात अनेकांना धक्का बसला आहे. स्थानिक लोकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिल्यावर अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास एका व्यक्तीनं भिवंडी परिसरात ईदगाह रोडवर नाल्यात महिलेचं मुडकं छाटलेला मृतदेह पाहिला. महिलेचं वय 25 ते 30 असल्याचं सांगितलं जात आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांनी सुरु केला तपास
भिवंडी पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर महिलेचं छाटलेलं मुंडकं ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर ते रुग्णालयात पाठवण्यात आलं. दरम्यान, याप्रकरणी आयपीसीच्या कलम 103 (1)हत्या आणि 238 (पुरावे नष्ट करणे) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा >> Maratha Reservation: हायकोर्टाचे आदेश आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं 'ते' विधान, आता नेमकं घडणार तरी काय?
पोलिसांकडून या घटनेचा तपास केला जात आहे. महिलेची ओळख अद्यापही समोर आली नाहीय. मृत महिलेची माहिती मिळवण्यासाठी स्थानिक लोकांची मदत घेतली जात आहे. तसच पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.
त्या ठिकाणीही घडली होती धक्कादायक घटना
बिहारच्या दरभंगा येथे धक्कादायक घटना घडल्याने मोठी खळबळ होती. येथे राहणाऱ्या एका पतीने कैचीने हल्ला करून पत्नीची निर्घृण हत्या केली होती. सुमित्रा देवी (27) असं मृत महिलेचं नाव आहे. लालबाबू असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली.
हे ही वाचा >> मध्यरात्री पतीच्या रुमची गुपचूप लावली कडी! वहिनी दीराच्या रुममध्ये गेली अन् सर्वात भयंकर कांड केलं, घडलं तरी काय?
ADVERTISEMENT
