VIDEO : पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या छतावर चढून मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा; नेमकं काय घडलं?

Pune Crime : पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या छतावर चढून मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा; नेमकं काय घडलं?

Mumbai Tak

मुंबई तक

05 Oct 2025 (अपडेटेड: 05 Oct 2025, 02:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या छतावर चढून मद्यधुंद तरुणाचा धिंगाणा

point

पुण्यातील हडपसर पोलीस स्टेशनच्या छतावर चढला तरुण

पुणे : पुण्यातील हडपसरमधून एक धक्कादायक प्रकार घडला आहे. हडपसर पोलीस स्टेशनच्या छतावर चढून एका दारुड्याने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आलाय. ही घटना आज सकाळी 11:20 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेला हा व्यक्ती अचानक पोलीस ठाण्याच्या छतावर उभा राहिला आरडाओरड करत गोंधळ घालू लागला. काही काळ तो वरून आरडाओरड व अपशब्दांचा भडिमार करत होता. या प्रकारामुळे ठाण्यात उपस्थित नागरिक आणि पोलीस अधिकारी हैराण झाले होते.

हे वाचलं का?

हेही वाचा : रामदास कदमांच्या बायकोने 1993 मध्ये स्वत:ला जाळून घेतलं की कोणी तिला जाळलं? अनिल परब यांचे सनसनाटी आरोप

हडपसर पोलीस स्टेशनवर चढून दारुड्याने घातला गोंधळ 

पोलिसांनी तत्काळ परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनेकदा समजावण्याचा प्रयत्न करूनही तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अखेर काही पोलिसांनी वर जाऊन त्याला खाली आणले आणि ताब्यात घेतले. दरम्यान, पोलीस या प्रकरणी त्याच्यावर कारवाई करणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. आतापर्यंत गुन्हेगार परिसरात दहशत माजवत होते, पण आता थेट पोलीस ठाण्यातच दारुड्यांचा राडा सुरू झाला आहे, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. 

एका दारुड्याने पोलीस ठाण्यात राडा घातला

हडपसर पोलीस स्टेशच्या छतावर चडून गोंधळ घातला pic.twitter.com/TJwWGqBcPQ

— Sumit Bhujbal (@SumitBhujb19648) October 5, 2025

 


दरम्यान, शिक्षणाचं माहेरघर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेल्या पुण्यात सध्या चाललंय तरी काय? असा सवाल विचारला जातोय. कारण, पुण्यातील गुन्हेगारी वाढल्याची चित्र गेल्या काही महिन्यांत समोर आलं आहे. पुण्यातील वाघोली येथे मध्यरात्रीच्या सुमारास एका तरुणाचा खून झाल्याची घटना देखील उघडकीस आली आहे. वाघोलीतील प्यासा हॉटेलसमोर मित्राने चाकूने वार करुन त्याची हत्या केल्याचा प्रकार समोर आलाय. या घटनेने परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली होती. ही हत्या नेमकं कोणत्या कारणातून झाली? याबाबत अद्याप कोणताही खुलासा झालेला नाही. दरम्यान आता फरार आरोपीला शोधून अटक करण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 

राजकीय दबाव? महाबळेश्वरमधील हॉटेल पुन्हा पोर्शे प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांच्या ताब्यात, प्रशासनाचा मोठा निर्णय

    follow whatsapp