घराच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारली, सुनेनं स्वत:ला संपवलं; आई-वडील म्हणाले सासू सासऱ्यांनी...

वाघोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्वातीचे मार्च 2024 मध्ये सूरज पाठक याच्याशी लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दहेजासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी आणि इतर नातेवाईकांनी तिला शारीरिक आणि मानसिक छळ केला.

Mumbai Tak

मुंबई तक

11 Jun 2025 (अपडेटेड: 11 Jun 2025, 08:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतरही सुनांचा छळ सुरूच

point

पुण्यातील वाघोलीत सुनेनं स्वत:ला संपवलं

हे वाचलं का?

Pune Crime News : पुण्यातील वाघोली परिसरात एक दु:खद घटना घडली आहे. येथे 20 वर्षीय स्वाती पाठक हिने आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनंतर स्वातीचा पती सूरज पाठक, सासू, सासरे आणि इतर नातेवाईकांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली.

हे ही वाचा >> गळ्यात ओढणी अडकवून दाखवत होता फास कसा घ्यायचा, एका झटक्यात बसला फास अन्.. हादरवून टाकणारा Video व्हायरल!

2024 मध्ये झालं होतं लग्न

वाघोली पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, स्वातीचे मार्च 2024 मध्ये सूरज पाठक याच्याशी लग्न झालं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, दहेजासाठी तिच्या सासरच्या मंडळींनी आणि इतर नातेवाईकांनी तिला शारीरिक आणि मानसिक छळ केला.

हे ही वाचा >> हनिमूनसाठी गेलेल्या राजाची सोनमने 'अशी' केली हत्या, हादरवून टाकणारा पोस्टमॉर्टम रिपोर्टच आला समोर

"हुंड्याच्या छळाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल"

पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं, "या छळाला कंटाळून स्वातीने आपल्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. आम्ही सूरज पाठक याला अटक केली असून, त्याच्या सासरच्या मंडळींवर आणि इतर नातेवाईकांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे."

यापूर्वीही घडली होती अशीच घटना

मे 2024 मध्ये पुण्यात  26 वर्षीय वैष्णवी हगवणे हिने स्वत:ला संपवलं होतं. आपला पती, सासू, सासरे, नणंद आणि दीर यांच्याकडून दहेजासाठी छळ झाल्याने आत्महत्या केल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबाने केलाय. या प्रकरणातील आरोपींच्या राजकीय संबंधांमुळे हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलं. मात्र, हे एवढं मोठं प्रकरण ताजं असताना सुनांचा छळ अजूनही थांबलेला दिसत नाही. 

    follow whatsapp