'ऑपरेशन हनीमून'अंतर्गत पोलिसांनी उघडली अनेक गुपितं, सोनमची अख्खी कुंडलीच काढली

मुंबई तक

10 Jun 2025 (अपडेटेड: 10 Jun 2025, 06:21 PM)

raja raguwanshi murder case : मेघालयातील शिलॉंग येथे राजा रघुवंशीच्या झालेल्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. या घटनेत पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तापस केला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागलेत. या प्रकरणाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.  मेघालय पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला ऑपरेशन हनीमून असे नाव दिले आहे. 

raja raguwanshi murder case in police reveal many secrets about sonam under 'operation honeymoon'

raja raguwanshi murder case in police reveal many secrets about sonam under 'operation honeymoon'

Google CTA

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशीच्या झालेल्या हत्येची देशभरत चर्चा

point

पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तापस केला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर आले

Raja raguwanshi Murder case : मेघालयातील शिलॉंग येथे राजा रघुवंशीच्या झालेल्या हत्या प्रकरणाची देशभरात चर्चा होत आहे. या घटनेत पोलिसांनी संपूर्ण घटनेचा तापस केला असता अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागलेत. या प्रकरणाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय.  मेघालय पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाला ऑपरेशन हनीमून असे नाव दिले आहे. 

हे वाचलं का?

हेही वाचा : आजीने बँकेतून 90 हजार रुपये काढले, नातवाने थेट तोंडात बोळा कोंबून... नांदेड हादरलं

राजा रघुवंशीच्या हत्येमागील मोठं गुपीत 

दरम्यान, या घटनेची एकूण माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांचं पथक नेमण्यात आलं होतं. या पथकात 20 सदस्यांचा समावेश करण्यात आला. या प्रकरणात एकूण 120 पोलिसांनी लक्ष्य घालत घटनेतील गुपीत बाहेर काढण्याचे काम केलंय. आतापर्यंत एकूण तपासातून ज्या गोष्टी समोर आल्याने या घटनेत मोठा ट्विस्ट निर्माण होणार आहे. 

हा कट नियोजनपूर्व आणि विचारपूर्वक रचण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाबाबत पोलिसांनी 7 जून रोजी एकाच वेळी सर्व ठिकाणी छापे टाकलेत. दरम्यान, या छाप्यात आरोपींची तपासणी केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर सीसीटीव्हीचे फुटेज समोर आल्यानंतर घटनेचा भांडाफोड झाला. सोनम सीसीटीव्हीत इतर तिघांसोबत दिसत होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनमनेच आरोपींना राजा रघुवंशीची हत्या करण्याचा इशारा दिला होता. संबंधित प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा 21 मे रोजी गुवाहाटी येथे पोहोचले असता, ते 22 मे रोजी सोनमच्या मागे शिलॉंगला गेले आणि 23 मे रोजी घटनास्थळी दाखल झाले. 

हत्येनंतर सोनम गुवाहाटीहून इंदूरला रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे. ती 25 मे रोजी इंदूर येथे पोहोचली असताना तिची राजासोबत भेट झाली. दरम्यान, तिला एका दिवसासाठी भाड्याच्या खोलीत ठेवण्यात आले. त्यानंतर सोनमला एका ड्रायव्हरने उत्तर प्रदेशात सोडले होते. 

यानंतर पोलिसांनी तपासादरम्यान, 42 सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करत घटनेचा शोध घेतला. या दरम्यान, सोनम आणि आरोपी हा मेघालयातील जवळच्या हॉटेलमध्ये थांबला. अशावेळी स्कूटीवरून येण्या जाण्याचा प्रकार हा पोलिसांच्या लक्षात आला. मिळालेल्या माहितीनुसार, राजाच्या हत्येप्रकरणातील आरोपींनी वापरलेले शस्त्र गुवाहाटीहून खरेदी करण्यात आले होते अशी माहिती समोर आली. 

हेही वाचा : पत्नीनं भावांना हाताशी घेत पती अन् लेकाला संपवलं, मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात...

फोटोवरुन बिंग फुटलं...

दरम्यान, हत्येनंतर दोघांचेही हनीमूनचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले नव्हते. हत्या झाल्यानंतर दुपारी 2 वाजून 15 मिनिटांनी सोनमने राजाचा फोटो  सोशल मीडियावर शेअर करत त्यावर 'सात जन्मो का साथ' असे कॅप्शन दिल्याने आणखी संशय बळावला. याचदरम्यान, 3 आणि  4 जून रोजी पोलिसांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. आरोपी आकाशचा शर्ट रक्ताने माखलेला होता. दरम्यान सोनमचा रेनकोट घटनास्थळापासून 6 किमी अंतरावर आढळला. यामुळेच या प्रकरणाला वेगळं वळण प्राप्त होण्यास फार विलंब लागला नाही.