'मला तुझ्या आईच्या चेहऱ्यावर दु:ख बघायचंय...' 5 वर्षीय चिमुरडीसोबत काय घडलं?

मुंबई तक

• 10:44 AM • 16 Jun 2026

एका पाच वर्षांच्या निष्पाप मुलीची तिच्याच शेजारी राहणाऱ्या महिलेने गळा दाबून हत्या केली. आरोपी महिलेला तिच्या पतीचे आणि पीडित मुलीच्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मला तुझ्या आईच्या चेहऱ्यावर दु:ख बघायचंय...

point

5 वर्षीय चिमुरडीसोबत काय घडलं?

Crime News : एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका पाच वर्षांच्या निष्पाप मुलीची तिच्याच शेजारी राहणाऱ्या महिलेने गळा दाबून हत्या केली. आरोपी महिलेला तिच्या पतीचे आणि पीडित मुलीच्या आईचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तसेच काही दिवसांपूर्वी पाणी भरण्याच्या कारणावरून झालेल्या वादाचा रागही तिच्या मनात होता. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत गुन्हा घडल्यापासून अवघ्या 48 तासांच्या आत सोमवारी आरोपी महिलेला अटक केली आहे. राजस्थानमधील जयपूर परिसरातील ही घटना आहे.

हे वाचलं का?

मुलगी बेपत्ता झाल्याचा फोन

ही धक्कादायक घटना शनिवारी (13 जून) घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी मुलीचे वडील कामावर गेले होते, त्यानंतर दुपारी 1 च्या सुमारास त्यांची मुलगी बेपत्ता झाल्याचे त्यांच्या पत्नीने फोन करून सांगितले. कुटुंबियांनी आणि स्थानिक नागरिकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती कुठेही न सापडल्याने अखेर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. तपास सुरू असताना पोलिसांना समजले की, ती चिमुरडी अनेकदा शेजारी राहणाऱ्या गुडिया देवी (30) हिच्या घरी खेळायला जात असे.

हे ही वाचा : 'मित्रा, तू असं का केलंस?' बायकोसोबत अनैतिक संबंध, शेवटी...

नवऱ्याचे शेजारणीशी संबंध

त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, ती मुलगी आरोपीच्या घरात जाताना दिसली, मात्र तिथून बाहेर आल्याचे कुठेही दिसले नाही. यावरून संशय बळावल्याने पोलिसांनी गुडिया देवीच्या घराची झडती घेतली. त्यावेळी एका ब्लँकेटमध्ये गुंडाळलेला त्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. गुडिया देवीचा पती अफरोज ऊर्फ फिरोज खान याच्याशी मुलीची आई फोनवर बोलते, असा संशय आरोपीला होता. त्यातच पाणी भरण्यावरून झालेल्या ताज्या वादाची भर पडल्याने ती चिडून होती.

हे ही वाचा : पुणे : आकुर्डीत डॉक्टरकडून महिला रुग्णाचा विनयभंग, महिला ओरडू लागली..

आईला दु:ख देण्यासाठी..

पीडित मुलीच्या आईला आयुष्यभराचे दुःख देण्याच्या हेतूने आरोपी गुडिया देवी गेल्या काही दिवसांपासून या गुन्ह्याचा कट रचत होती. 13 जून रोजी जेव्हा ती चिमुरडी खेळता खेळता तिच्या घरी आली, तेव्हा आरोपीने तिला घरात कोंडले आणि तिचे तोंड दाबून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर तिने मृतदेह ब्लँकेटमध्ये लपवून ठेवला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी रात्रीच्या अंधारात हा मृतदेह जवळच्या जंगलात फेकून देण्याची तिची योजना होती. सध्या पोलिसांनी याप्रकरणी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.