सोनम बेवफा! राजाचा मृतदेह खोल दरीत कोणी फेकला? सर्वात मोठा खुलासा, सोनम अन् किलर्सने...

Raja And Sonam Murder Case : राजा रघुवंशी हत्याप्रकरणी सर्वात मोठा आणि खळबळजनक खुलासा समोर आला आहे. शिलाँगचे DIG डेविस एन आर मार्कने आज तकशी बोलताना या केस संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आणलीय.

Raja And Sonam Honeymoon Case latest News

Raja And Sonam Honeymoon Case latest News

मुंबई तक

• 09:39 PM • 11 Jun 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

राजा रघुवंशी हत्याप्रकरणात मोठी अपडेट समोर

point

राजाचा मृतदेह खोल करीत कोणी फेकला?

point

खुद्द सोनमनेच केला याचा खुलासा..

Raja And Sonam Murder Case : राजा रघुवंशी हत्याप्रकरणी सर्वात मोठा आणि खळबळजनक खुलासा समोर आला आहे. शिलाँगचे DIG डेविस एन आर मार्कने आज तकशी बोलताना या केस संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आणलीय. मार्क यांच्या माहितीनुसार, फक्त तीन सुपारी किलर्स नाही, तर स्वत: सोनम रघुवंशीने राजाचा मृतदेह उचलून दरीत फेकला होता. खूप मोठा कट रचून राजाचा हत्याकांड करण्यात आला. 

हे वाचलं का?

पोलीस तपासात समोर आली धक्कादायक माहिती

पोलीस तपासात उघड झालंय की, घटना घडली त्या दिवशी तिन्ही सुपारी किलर्स दोन स्कूटीवर पोहोचले होते. हत्येनंतर एका स्कूटीवर दोन किलर्स आणि दुसऱ्या स्कूटीवर सोनम आणि एक किलर बसला होता. सर्व क्राईम सीनपासून 10 किमी दूर गेले होते. म्हणजेच राजाची हत्या केल्यानंतर सोनम या किलर्ससोबत होती आणि राजाचा मृतदेह लवण्यात तिने मदत केली.

हे ही वाचा >>सोनम अन् तिच्या बॉयफ्रेंडचा 'तो' फोटो व्हायरल! कुठे क्लिक केला...खळबळजनक माहिती आली समोर

डीआयजी मार्क यांनी म्हटलंय की, सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहने केलेला गुन्हा कबूल केला. या हत्येचा मास्टरमाईंड कोण आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला तेव्हा, दोघेही ऐकमेकांवर आरोप करायला लागले. हा आरोप प्रत्यारोपाचा खेळ आता पोलीस तपासासाठी मोठं आव्हान बनलं आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोनम आणि राजाकडे एकूण चार मोबाईल फोन होते. पण आतापर्यंत एकच फोन सापडला आहे. इतर तीन मोबाईल फोन अद्यापही गायब आहेत. हे मोबाईल या हत्या प्रकरणात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतात.याआधी शिलाँगचे एसपी यांनी मोठा खुलासा करत दावा केला होता की, मेघालय पोलिसांकडे सोनम रघुवंशी आणि अन्य आरोपींविरोधात ठोस पुरावे आहेत. ज्यामुळे सिद्ध होतं की, ते हत्याकांडमध्ये सामील होते. मेघालय पोलिसांनी सोनम आणि तिचा प्रियकर राज कुशवाहला समोरासमोर आणलं. ज्यानंतर सोनमने तिचा पती राजाच्या हत्येचा कट रचल्याचं कबूल केलं. 

हे ही वाचा >> महिलेचे 12 वर्षांपासून शेजाऱ्यासोबत शारीरिक संबंध, पतीने आधी समजवलं अन् नंतर...

    follow whatsapp