महिलेचे 12 वर्षांपासून शेजाऱ्यासोबत शारीरिक संबंध, पतीने आधी समजवलं अन् नंतर...
हरियाणामध्ये एका पतीने आपल्या पत्नीचे शेजाऱ्याशी अवैध संबंध असल्याच्या संशयावरून तिची हत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

महिलेचे 12 वर्षांपासून शेजाऱ्यासोबत अवैध संबंध

पत्नीने ऐकलं नाही म्हणून पतीने तिच्यावर केले हातोड्याने वार

नेमकी घटना काय?
Haryana News: हरियाणाच्या सिरसा जिल्ह्यातून एक भयानक घटना समोर आली आहे. एका पतीने आपल्या पत्नीचे शेजाऱ्याशी अवैध संबंध असल्याच्या संशयावरून तिची हत्या केली. यानंतर आरोपीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. सुरुवातीला सगळं काही ठीक होतं असं म्हटलं जात आहे, पण गेल्या 10 ते 12 वर्षांपासून वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण झाल्याचं सांगितलं जात आहे.
ही घटना सिरसा जिल्ह्यातील मीरपूर कॉलनीमध्ये घडल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीचे नाव माखन सिंग असून तो मूळचा सिरसा येथील हंजिरा गावचा रहिवासी आहे. माखनचा 2004 मध्ये आरतीशी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले आहेत. माखन कष्टाची मजुरी करून घर चालवत होता.
नेमकं काय घडलं?
खरंतर, माखन सिंगची पत्नी आरती हिचे शेजारी राहणाऱ्या लाखी सिंगशी अवैध संबंध असल्याचा असा आरोप आहे. लाखीच्या पत्नीला हे कळले आणि तिला या सगळ्यामुळे धक्काच बसला. दरम्यान, 7 जून रोजी आरती लाखीला भेटायला गेली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लाखीची पत्नी पोलिसांसह माखनच्या घरी पोहोचली. लाखीच्या पत्नीने माखनला 'आरतीला समजावून सांगून तिला पटवून द्या', असं सांगितलं.
हातोड्याने केले वार
लाखीची पत्नी गेल्यानंतर, या प्रकरणावरून माखन आणि आरतीमध्ये मोठं भांडण झाले. दरम्यान, 9 जून रोजी पहाटे 5 वाजता माखन चहा पीत असताना त्याने आरतीला विचारले की लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही ती घर का उध्वस्त करत आहे? या मुद्द्यावरून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रागाच्या भरात माखनने आरतीच्या डोक्यावर हातोड्याने वार केले. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. घटनेच्या वेळी मुले त्यांच्या मावशीच्या घरी होती.