Crime News: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात दुहेरी हत्याकांड झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका तरुणाने त्याच्या वहिनीवर, बहिणीवर आणि वहिनीच्या प्रियकरावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती आहे. यामध्ये हल्लेखोराच्या वहिनीचा आणि तिच्या प्रियकराचा मृत्यू झाला असून त्याची बहीण गंभीररित्या जखमी असल्याचं सांगितलं जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या घटनेनंतर आरोपीने पोलीस स्टेशनमध्ये पोहोचून सरेंडर केलं. त्याने पोलिसांना घडलेल्या घटनेबद्दल पूर्ण माहिती दिली. या घटनेत, दोघांचा मृत्यू झाला असून आरोपी तरुणाची बहीण गंभीररित्या जखमी आहे. तिला आता रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार केले जात आहेत.
ADVERTISEMENT
चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या
संबंधित घटना ही थिरगांव पोलीस स्टेशन हद्दीतील हसवा गावात घडली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी तरुणाने त्याच्या वहिनीच्या प्रियकराची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली आणि नंतर, आपल्या बहिणीवर सुद्धा जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लगेच त्याच्या वहिनीवर आणि बहिणीवर हल्ला केला. या हल्ल्यात, त्याच्या वहिनीचा सुद्धा मृत्यू झाला असून त्याची बहीण गंभीररित्या जखमी झाली. पोलिसांनी सांगितलं की, आरोपी शुक्रवारी दुपारच्या सुमारास हसवा पोलीस स्टेशनमध्ये आला आणि त्याने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली. दिलदार कुरैशी अशी आरोपी तरुणाची ओळख समोर आली आहे.
हे ही वाचा: ठाकरेंच्या उमेदवारासाठी रवीना टंडनचा प्रचार, पण 'त्या' वार्डात निकाल काय आला? अभिनेत्री परदेशात गेल्याने चर्चेला उधाण
आरोपी दिलदारने पोलिसांना सांगितलं की, त्याने त्याचा साथीदार फैजान (27), त्याची वहिनी जिकरा परवीन (22) आणि बहीण मन्नू (21) यांची निर्दयी हत्या केली. संबंधित घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे फैजान गावाबाहेर मृतावस्थेत आढळला तसेच, आरोपीची वहिनी आणि बहीण जखमी अवस्थेत आढळले. त्यानंतर, जखमी पीडितांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे डॉक्टरांनी जिकरा हिला मृत घोषित केलं.
पोलिसांच्या चौकशीदरम्यान दिलदारने सांगितलं की, फैजान आणि त्याच्या वहिनीचे प्रेमसंबंध सुरू होते आणि या दोघांच्या नात्याला त्याच्या बहिणीचा पाठिंबा होता. त्यामुळे, आरोपी तरुणाने त्या तिघांच्या हत्येची योजना आखली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या, आरोपी दिलदारला अटक करण्यात आली असून दोघांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. हत्येत वापरण्यात आलेला चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
ADVERTISEMENT











