Solapur Crime : सोलापूरमध्ये एक मन हेलावून टाकणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरू आणि शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली. एका 56 वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला. या कृत्यानंतर शिक्षकाने कोणाला काहीही न सांगण्याची विद्यार्थिनीला धमकी दिली होती. ही घटना 19 एप्रिल ते 3 जुलै रोजी शाळेच्या पार्किंगमध्ये घडली होती. भीतीपोटी अल्पवयीन विद्यार्थ्यिनीने कुठेही तक्रार दाखल केली नाही.
ADVERTISEMENT
हेही वाचा : 1 ऑगस्ट आजपासून शनि-शुक्र केंद्र योग, काही राशीतील लोकांची बोटे तुपात
संबंधित प्रकरणात खासगी शाळेच्या मुख्याध्यापकांना या घटनेची माहिती मिळाली असता, नराधम शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी आरोपी शिक्षकाविरोधात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याने पोक्सो अंतर्गत विविध कलमान्वये सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संबंधित प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
सोलापूरात अशीच एक घटना
काही महिन्यांपूर्वी सोलापूरात एका नामांकित शाळेत शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेनं पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केलं की, 'मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरेवाईट करून घेईन', अशी धमकी देऊन मानसिक त्रास दिल्याचे फिर्यादीत नमूद केलं.
हेही वाचा : रमीने होत्याचं नव्हतं केलं.. अखेर माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं! नवे कृषी मंत्री कोण?
एवढंच नाही,तर अल्पवयीन विद्यार्थिनीशी संवाद साधून प्रपोज केला. त्यानंतर विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतर तिचा हात धरला नंतर जबरदस्ती तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षिकाविरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
