Raja-Sonam Honeymoon Case : राजा-सोनम हनिमून प्रकरणाने संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी राजा रघुवंशीची पत्नी सोनमने राजाची हत्या केल्याचं कबूल केलंय. सोनम एसआयटीने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भावुक झाली होती. सोनम रडत रडत पोलिसांना म्हणाली, तिनेच प्रियकर राजसाठी तिचा पती राजाला रस्त्यातून बाहेर केलं. हा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा पोलिसांनी सोनम आणि अन्य आरोपींमध्ये घटनेनंतर झालेल्या चर्चेचं सीसीटीव्ही फुटेज तपासलं.
ADVERTISEMENT
सोनमला पकडण्यात गाईड अल्बर्टची महत्त्वाची भूमिका
मिळालेल्या माहितीनुसार, अल्बर्ट पीडी नावाच्या गाईडने पोलिसांना सांगितलं होतं की, त्यांनी 22 मे रोजी सोनम आणि राजासोबत अन्य तीन पुरुषांना पाहिलं होतं. हे सर्व नोंग्नियाटहून मावलखियाटकडे 3000 हून अधिक पायऱ्या चढून जात होते. राजासह चार पुरुष पुढे जात होते आणि एक महिला सोनम त्याच्या मागे होती.
हे ही वाचा >> भाऊजीला पाय तुटेपर्यंत मारलं...पत्नीला कंटाळल्यानं वेगळं राहायचा निर्णय, मेहुणा अन् सासूची मारहाण
अल्बर्टने सांगितलं की, ते सर्व हिंदी भाषेत बोलत होते. अल्बर्टला हिंदी चांगल्या प्रकारे समजत नव्हती. पण त्यांचं कृत्य संशयास्पद असल्याचं समजलं. त्यानंतर अल्बर्टने पोलिसांना याबाबत तातडीनं अलर्ट केलं. त्याआधीच सोनम त्या ठिकाणाहून निघून गेली होती. त्यानंतर तिने भावनसाई नावाच्या गाईडसोबत प्रवास केला. ज्याने त्यांना शिपारा होम स्टे पर्यंत सोडलं होतं. त्यानंतर मेघालय पोलिसांनी याप्रकरणाला ऑपरेशन सिंदूर नाव दिलं. ज्यामध्ये एकूण 120 पोलिसांनी सहभाग घेतला होता.
हत्येनंतर राजाच्या अकाऊंटहून शेअर केली होती ही पोस्ट
रिपोर्टनुसार, 23 मे रोजी दुपारी 2.15 च्या सुमारास राजाच्या अकाऊंटवरून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. यामध्ये लिहिलं होतं की, ,सात जन्माची साथ आहे. राजाची हत्या झाल्यानंतर ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. सोनमनेच ही पोस्ट शेअर करून पोलिसांच्या तपासाला चकवा देण्याचा प्रयत्न केला होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
हे ही वाचा >> बॉयफ्रेंड राज सोनमला सगळ्यांसमोर दीदी बोलायचा, पण नंतर भलतंच... राज कुशवाहच्या आईने उडवली खळबळ!
पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल चौहान नावाच्या आरापीने राजावर पहिला वार केला होता. राजाची हत्या करताना जे धारदार शस्त्र वापरण्यात आले होते, ते शस्त्र आरोपींनी गुवाहाटी रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या एका दुकानातून खरेदी केलं होतं. सोनम सतत तिचा प्रियकर राज कुशवाह आणि अन्य आरोपींच्या संपर्कात होती.
ADVERTISEMENT
