IPL: कोल्हापूर हादरलं, लाठ्याकाठ्यांनी हल्ला अन्..., रोहित शर्मा बाद होताच जल्लोष करणं वृद्धाला भोवलं!

कोल्हापूरात काही लोक टीव्हीवर आयपीएल सामना पाहत होते. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि मुंबई इंडियन्स (MI) या संघांचा हा सामना होता. यावेळी काही लोकांनी एका 65 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला आणि यासर्वात त्या वृद्धाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Mumbai Tak

रोहिणी ठोंबरे

01 Apr 2024 (अपडेटेड: 01 Apr 2024, 03:35 PM)

follow google news

Kolhapur Murder Case : IPL 2024 ला सुरूवात झालेली असताना चाहत्यांचा उत्साह हा गगनात मावेनासा आहे. कुणी धोनीला सपोर्ट करत आहे तर कुणी विराट आणि रोहितला... काहीजण तर त्यांचे एवढे मोठे फॅन आहेत की, त्यांना चक्क देवाप्रमाणे मानतात. इथपर्यंत या गोष्टी ठीक वाटतात पण यातून जर भलतंच घडत असेल तर... क्रिकेटपटूंच्या प्रेमात वेडे होऊन कुणी कुणाचा जीव घ्यायलाही मागे-पुढे पाहत नसेल तर, हो असं घडलं आहे. कोल्हापूरात जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. ज्यामुळे संपूर्ण शहर हादरलं आहे.

हे वाचलं का?

कोल्हापूरात काही लोक टीव्हीवर आयपीएल सामना पाहत होते. सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि मुंबई इंडियन्स (MI) या संघांचा हा सामना होता. यावेळी काही लोकांनी एका 65 वर्षीय व्यक्तीवर हल्ला केला आणि यासर्वात त्या वृद्धाचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

वादाचं नेमकं कारण काय?

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई इंडियन्सचा खेळाडू रोहित शर्मा बुधवारी (27 मार्च) हैदराबाद सनरायझर्सविरुद्धच्या सामन्यातून बाहेर पडला. हे टीव्हीवर पाहत असताना 65 वर्षीय बंडूपंत तिबिले खुश झाले. यानंतर तेथे बसलेल्या बळवंत झांझे आणि सागर झांजे या दोन तरुणांनी त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला.

करवीर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, तिबिले यांचा शनिवारी (30 मार्च) रुग्णालयात मृत्यू झाला, त्यानंतर बळवंत आणि सागर यांना अटक करण्यात आली.

IPL 2024 च्या 8 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम  फलंदाजी करताना हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या केली. मुंबईविरुद्ध हैदराबादने 20 षटकांत 3 गडी गमावून 277 धावा केल्या. हैदराबादने या डावात एकूण 18 षटकार आणि 19 चौकार लगावले. यानंतर मुंबईसमोर 278 धावांचे मोठे लक्ष्य होते. याला प्रत्युत्तर म्हणून मुंबईने सर्व शक्तीनिशी प्रयत्न केले पण लक्ष्य गाठता आले नाही. मुंबईला 20 षटकांत 5 गडी गमावून केवळ 246 धावा करता आल्या.
 

    follow whatsapp