संपत्तीवरुन वाद, सावत्र भावाला संपवलं आणि मृतदेह जंगलात फेकला... पोलिसांनी कसा केला तपास?

मुंबई तक

22 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 09:06 AM)

धक्कादायक म्हणजे आरोपी भावाची हत्या करून तिथेच थांबला नाही. त्याने नंतर मृतदेह जंगलात फेकला. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी माहिती दिली.

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

पोलिसांनी कसा केला गुन्ह्याचा तपास?

point

ठाण्यातील प्रकरणात हादरवून टाकणारी माहिती समोर

point

सावत्र भावानेच केली तरूणाची हत्या

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील नलिम्बी गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरूणाची त्याच्या सावत्र भावाचीच हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 25 वर्षीय सलमान मोहम्मद अंसारी याला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. 

हे वाचलं का?

खून करून मृतदेह जंगलात फेकला

हे ही वाचा >> मुंबईत मुसळधार पावसाचा धमाका! वाहतुकीवरही होणार परिणाम? कसं असेल आजचं हवामान? जाणून घ्या

धक्कादायक म्हणजे आरोपी भावाची हत्या करून तिथेच थांबला नाही. त्याने नंतर मृतदेह जंगलात फेकला. या प्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी माहिती दिली.

पोलिसांनी कसा केला तपास? 

29 मे रोजी नलिम्बी गावातील जंगलात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांनी परिसरातील सीसीटीवी फुटेज तपासले आणि राज्यभरातील हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदींसह त्याची पडताळणी केली. मृत व्यक्तीची छायाचित्र सार्वजनिक ठिकाणी आणि व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकण्यात आली. त्यानंतर पोलिसांना या तपासात यश आलं.

हे ही वाचा >> कोकणासह रायगड रत्नागिरीसह 'या' पावसाचा जोर कायम, पुणे आणि साताऱ्यात येलो अलर्ट

घटनास्थळाजवळ एका अज्ञात कारची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी सलमान मोहम्मद गौरी अंसारी याला ताब्यात घेतलं. तो टिटवाळा येथील मांडा भागाचा रहिवासी आहे. चौकशीत त्याने आपला सावत्र भाऊ फैजल मोहम्मद अंसारी (वय 29) याची हत्या केल्याची कबुली दिली. दोघांमध्ये संपत्तीच्या वादातून सतत भांडणे होत असल्याचं तपासात उघड झालं. याच कारणास्तव सलमानने फैजलची हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितले.