बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंडचा सुरू होता रोमान्स, मागून आले दोन तरुण अन् प्रियकर गेला पळून, नंतर...

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे एक मुलगी तिच्या प्रियकरासह फिरायला गेल्यानंतर दोन्ही आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं?

तरुणीवर सामूहिक अत्याचार अन्...

तरुणीवर सामूहिक अत्याचार अन्...

मुंबई तक

05 Aug 2025 (अपडेटेड: 07 Aug 2025, 01:28 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

कपलचा रोमान्स सुरु असताना तरुणीवर सामूहिक अत्याचार

point

प्रियकर गेला पळून आणि आरोपी तरुणांनी पीडितेवर...

Gang Rape Case: उत्तर प्रदेशातील कानपूरमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. येथे एक मुलगी तिच्या प्रियकरासह फिरायला गेल्यानंतर दोघेही एका ठिकाणी एकत्र बसले होते. त्यानंतर दोन तरुणांनी त्यांचा लपुनछपून व्हिडिओ बनवला. संबंधित तरुणांनी जोडप्याला व्हिडिओ दाखवला आणि तो व्हिडीओ त्यांच्या घरी दाखवण्याची धमकी दिली. संबंधित तरुणी आणि तिचा प्रियकर घाबरले आणि आरोपींना हे सगळं करण्यामागचा जाब विचारला. मात्र, त्यावेळी  दोन्ही आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. नेमकं काय घडलं? 

हे वाचलं का?

पीडितेवर सामूहिक अत्याचार 

दोन्ही आरोपींनी जोडप्याला व्हिडीओ दाखवल्यानंतर ती घरी दाखवण्याची धमकी दिली. आरोपी तरुणांना हे सगळं करण्यामागचा जाब विचारला असता दोघांनीही पीडित मुलीशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. परंतु, प्रियकर संधी साधून तेथून पळून गेला आणि त्याने आपल्या प्रेयसीला वाचवण्याचा प्रयत्नही केला नाही. त्यानंतर दोन्ही आरोपींनी मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी मुलीने पोलिसात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला असल्याची माहिती आहे. तक्रार करताना मुलीने सांगितले की, ती 26 जुलै रोजी तिच्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली होती आणि तिवारीपूर गावाजवळील महाराजपूर येथे एका निर्जन ठिकाणी बसली होती.

हे ही वाचा: प्रेम, विश्वासघात आणि जादूटोणा... पतीपासून वैतागलेली तबस्सुम प्रियकराच्या नादात नको ते करुन बसली!

पैशांसाठी ब्लॅकमेल 

दरम्यान, दोन तरुणांनी तिचा तिच्या प्रियकरासोबतचा व्हिडिओ बनवला आणि पैशासाठी तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. यादरम्यान, तिचा प्रियकर घाबरला आणि घटनास्थळावरून पळून गेला. प्रियकर पळून गेल्यानंतर, दोन्ही तरुणांनी तिच्याकडून पैशांची मागणी करण्यास सुरुवात केली. जेव्हा तिने तिच्याकडे पैसे नसल्याचं सांगितलं तेव्हा त्या दोघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दोन्ही तरुणांनी तिची नोज पिन हिसकावण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप पीडित तरुणीने केला आहे.

हे ही वाचा: "मी तिचा पहिला रुग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर..." अभियंत्याने लिहिली 'ती' कहाणी अन् हॉटेलमध्येच संपवलं आयुष्य...

आरोपींविरोधात गुन्हा दाखल 

पीडितेच्या म्हणण्यानुसार, ती तिच्या प्रियकरासह बाजारात आली होती आणि त्यानंतर ती एका निर्जन ठिकाणी बसली असताना ही घटना घडली. यानंतर मुलीने पोलिसांना माहिती दिली. तिच्यावर झालेला गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचा देखील आरोप आहे. नंतर, तरुणीने एसीपी अभिषेक पांडे यांच्याकडे मदतीची याचना केली. एसीपी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने दोन तरुणांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपींच्या तपासासाठी छापे टाकण्यात येत आहेत. तसेच, सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जात असून अटकेसाठी सर्व्हिलान्सच्या मदतीने लवकरच आरोपींना पकडले जाईल.

    follow whatsapp