भाच्याला मामीसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध... वासनांध तरूणासोबत मामाने 'हे' काय केलं?

एका महिलेने तिच्या पतीसोबत मिळून आपल्या भाच्याची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित घटना ही कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती आहे. मृत तरुणाला आपल्या मामीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते, असं सांगितलं जात आहे.

'अशी' केली निर्दयी हत्या!

'अशी' केली निर्दयी हत्या!

मुंबई तक

01 Nov 2025 (अपडेटेड: 01 Nov 2025, 07:28 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

भाच्याला मामीसोबत ठेवायचे होते शारीरिक संबंध

point

मामासोबत वाद पेटला अन् 'अशी' केली निर्दयी हत्या!

Crime News: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेने तिच्या पतीसोबत मिळून आपल्या भाच्याची हत्या केल्याचं वृत्त समोर आलं आहे. संबंधित घटना ही कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती आहे. प्रकरणातील मृत तरुणाला आपल्या मामीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे होते, असं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

मामीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास एक 35 वर्षीय इमरान नावाचा तरुण शिकारपुर नगर परिसरातील आपल्या मामाच्या घरी गेला होता. तरुणाच्या मामाचं नाव जावेद असून त्याच्या मामीचं नाव रुकसाना असल्याचं समोर आलं आहे. त्यावेळी, कोणत्या तरी कौटुंबिक कारणावरून इमरानचं त्याच्या मामी आणि मामासोबत भांडण झालं. दरम्यान, आरोपी इमरानने त्याच्या मामीचा विनयभंग केला आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याच्या प्रयत्न केल्याचं सांगण्यात येत आहे. 

हे ही वाचा: राज ठाकरेंनी दाखवला सर्वात मोठा पुरावा, उडवून दिली खळबळ... म्हणाले, 'मुरबाडमध्ये राहणाऱ्यांनी...'

हातोडीने आणि चाकूने हल्ला...

त्यानंतर, त्यांच्यातील वाद वाढत गेला आणि रागाच्या भरात रुकसानाने तिच्या भाच्याच्या डोक्यावर हातोडीने वार केला. या हल्ल्यात इमरान गंभीररित्या जखमी झाला. त्यानंतर, जावेदने सुद्धा इमरानवर चाकूने हल्ला केला आणि यामुळे त्याची प्रकृती आणखी बिघडली. घटनेनंतर, दोन्ही आरोपींनी इमरानला गंभीररित्या जखमी झालेल्या अवस्थेत तिथे घरातच सोडलं आणि दरवाजाला बाहेरून कुलूप लावलं. धक्कादायक बाब म्हणजे, दोन्ही आरोपींनी शिकारपुर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वत:ला सरेंडर केलं. आता पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा: एकादशी निमित्ताने आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर मंदिरात मोठी गर्दी, चेंगराचेंगरी होऊन 10 भाविकांचा दुर्दैवी मृत्यू

पोलिसांचा तपास 

आरोपींकडून या घटनेबद्दल कळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहोचलं. पोलिसांनी दरवाजाचं कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि त्यांना रक्ताच्या थारोळ्यात इमरानचा मृतदेह आढळला. त्यानंतर, गंभीररित्या जखमी झालेल्या तरुणाला उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं आणि इमरानची प्रकृती नाजूक असल्याकारणाने तिथून त्याला मेरठ येथे रेफर करण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेत असतानाच पीडित तरुणाचा वाटेत मृत्यू झाला. पोलिसांनी इमरानचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. मृतांच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी जावेद आणि मामी रुकसानाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. तसेच, आरोपींना अटक केल्याची सुद्धा माहिती आहे. 

    follow whatsapp