Crime News: बिहारच्या निवडणूकीबाबत चर्चा करणं एका डेन्टिस्टला महागात पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. लखनऊच्या चिनहट पोलीस स्टेशन परिसरातील मल्हौर येथे एका मेडिकल स्टोअरच्या मालक आणि डेन्टिस्ट (दंतवैद्य) म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणांमध्ये बिहारच्या निडवणूकांमध्ये सीट्सच्या जागांबद्दल वाद सुरू झाला. मात्र, त्यावेळी त्या स्टोअर मालकाने तरुणाला बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
ADVERTISEMENT
बिहार निवडणुकीत भाजपच्या जागांचा विषय
इतकेच नव्हे तर, मेडिकल स्टोअर मालकाने दुसऱ्या दिवशी दारू पिऊन पुन्हा तरुणाला शिवीगाळ करत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर, पीडित डॉक्टर श्रवण कुमार तिवारी याने चिनहाट पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. पोलिसात तक्रार करताना पीडित डॉक्टर म्हणाला की, तो निजामपूर मल्हौर येथे सूर्या डेंटल क्लिनिक चालवतो. शनिवारी संध्याकाळी क्लिनिक बंद केल्यानंतर तो घरी परतत असताना एका ओळखीच्या व्यक्तीशी बोलणं सुरू असताना बिहार निवडणुकीत भाजपच्या जागांचा विषय निघाला.
हे ही वाचा: मामाच्या मुलाने 8 वर्षे ठेवले शारीरिक संबंध... नंतर, दुसऱ्या तरुणीसोबत लग्न करायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं!
हाताच्या अंगठ्याला चावा घेतला अन्...
दरम्यान, शेजारीच मेडिकल स्टोअर चालवणारा चंद्र प्रकाश यादव तिथे आला आणि त्याने डॉक्टरला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. खरं तर, पीडित तरुणाने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला पण, याउलट स्टोअर मालकाने त्याच्यावर काठीने हल्ला केला. स्वतःचा बचाव करण्याच्या प्रयत्नात त्याने डॉक्टरच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. या हल्ल्यात पीडित डॉक्टरचं घडल्याळ आणि चेन तुटून खाली पडली आणि त्यानंतर, ते त्याला सापडलं नाही.
हे ही वाचा: मोठी बातमी : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर अघोरी पूजा, बारामतीत भानामतीचा धक्कादायक प्रकार
पोलिसांनी दिली माहिती
पीडित डॉक्टरने केलेल्या आरोपानुसार, दुसऱ्या दिवशी चंद्र प्रकाश आणि त्याचा मित्र जसवंत यादव दारू पिऊन आले आणि त्यांनी त्या तरुणाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जेव्हा डॉक्टरने आरोपींना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी क्लिनिक रिकामं करण्याची आणि त्याला ठार मारून टाकण्याची धमकी दिली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पीडित तरुणाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT










