दोन्ही मित्रांनी अनोळखी महिलेला झोपडीत आणलं, तिघांनी दारू प्यायली अन् शारीरिक संबंध... पण शेवटी नको ते घडलं

पीडितेने दोघांसोबत मिळून दारू प्यायली आणि त्यानंतर, दोन्ही तरुणांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध सुद्धा प्रस्थापित केले. पण, शेवटी एक धक्कादायक घटना घडली.

दारू प्यायली अन् शारीरिक संबंध... पण शेवटी नको ते घडलं

दारू प्यायली अन् शारीरिक संबंध... पण शेवटी नको ते घडलं

मुंबई तक

• 03:50 PM • 05 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

दोन्ही मित्रांनी मिळून अनोळखी महिलेसोबत केलं धक्कादायक कृत्य

point

तिघांनी दारू प्यायली आणि शारीरिक संबंध...

Crime News: दोन मित्रांनी मिळून एका महिलेची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. देवेंद्र सिंग आणि सूरज पाल अशी आरोपींची नावे असून ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. घटनेच्या ठिक चार तासांपूर्वी त्या दोघांची मृत महिलेशी ओळख झाली होती. पीडितेने आरोपींसोबत मिळून दारू प्यायली आणि त्यानंतर, दोघांनी तिच्यासोबत शारीरिक संबंध सुद्धा प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर त्या तिघांमध्ये मोठा वाद झाला. याच वादात देवेंद्र आणि सूरजने महिलेची हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी आता दोन्ही आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. संबंधित प्रकरण हे लखनऊमधील असल्याची माहिती आहे. 

हे वाचलं का?

शारीरिक संबंधाच्या बदल्यात दारूची डील 

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपी देवेंद्र म्हणाला की, सोमवारी रात्री जवळपास 8 वाजताच्या सुमारास तो नबावपुरवा येथे देशी दारूच्या दुकानात गेला होता. तिथून परतत असताना वाटेत एका महिलेने हात दाखवून त्याची ई-रिक्षा थांबवली आणि त्यात ती बसली. रस्त्यातच दोघांमध्ये बोलणं सुरू असताना, दोघांमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची डील झाली. या बदल्यात महिलेने तिला दारू पाजण्यास सांगितली. देवेंद्रने लगेच त्याचा मित्र सूरजला फोन करून याबाबतीत सांगितलं. त्यानंतर, तो महिलेला सूरजच्या एका झोपडीत घेऊन गेला. तिथे तिघांनी दारू प्यायली आणि दोन्ही आरोपींनी  महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र, काही वेळानंतर ती महिला पैशांच्या कारणावरून दोघांसोबत भांडू लागली. त्यावेळी, आरोपी तरुणांनी रागाच्या भरात पीडितेला धक्का दिला. 

हे ही वाचा: "या 5 पद्धतीने तुझे अश्लील व्हिडीओ बनवून पाठव..." अनोळखी नंबरवरून पीडितेला मॅसेज अन् शारीरिक संबंधाची मागणी...

फळीवर महिलेचं डोकं आपटलं अन्... 

धक्का लागल्याने महिलेचं डोकं घरातील मागच्या फळीवर आपटलं आणि तिथेच ती बेशुद्ध पडली. पीडिता बराच वेळ बेशुद्ध राहिल्यामुळे दोघेही घाबरले आणि त्यावेळी, त्यांनी पहाटे 3 वाजेपर्यंत वाट पाहिली. त्यानंतर, तिची हालचाल झाली नसल्याने दोघांनी तिचा मृतदेह सूरजच्या रिक्षात टाकला आणि महिला दारूच्या नशेत पडल्याचं दाखवण्यासाठी मृतदेह विशाल खंडच्या एका निर्जन गल्लीतील भिंतीला लागून ठेवला. या घटनेनंतर दोन्ही आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. 

हे ही वाचा: चाकूने वार करत तरुणीने प्रियकरालाच संपवलं! नंतर, स्वत:ला सुद्धा जखमी केलं अन्... नागपुरात प्रेमसंबंधातून भयानक घटना

पोलिसांची माहिती 

महिलेचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी 5 पथके तयार केली. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आणि आसपासच्या संशयास्पद व्यक्तींची चौकशी करण्यात आली. मेन्युअल डेटा, आउटपुट फुटेज आणि स्थानिकांच्या जबाबाच्या आधारे बुधवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. देवेंद्र सिंग आणि सूरज पाल अशी आरोपींची ओळख समोर आली असून दोघे गोमतीनगरच्या विशाल खंड-2 येथील रहिवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं. 

    follow whatsapp