खोलीत विधवा सून ‘त्या’ अवस्थेत... सासऱ्याने पाहिलं अन् घडला भयानक प्रकार! मध्यरात्री नेमकं काय घडलं?

एके दिवशी मध्यरात्री तिने तिच्या प्रियकराला घरी भेटायला येण्यास सांगितलं. त्यावेळी प्रियकर तिला भेटायला गेला. महिलेने तिच्या दोन्ही मुलांना खोलीत झोपवलं आणि नंतर खोलीला बाहेरून कडी लावली.

खोलीत विधवा सून ‘त्या’ अवस्थेत...

खोलीत विधवा सून ‘त्या’ अवस्थेत... (फोटो सौजन्य: Grok AI)

मुंबई तक

• 12:07 PM • 21 Sep 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

खोलीत विधवा सूनेला सासऱ्यांनी ‘त्या’ अवस्थेत पाहिलं...

point

मध्यरात्री घडला भयानक प्रकार!

Crime News: उत्तर प्रदेशातील अलिगडमध्ये, दोन मुलांची एक विधवा आई दुसऱ्याच तरुणासोबत प्रेमसंबंधात होती. एके दिवशी मध्यरात्री तिने तिच्या प्रियकराला घरी भेटायला येण्यास सांगितलं. त्यावेळी प्रियकर तिला भेटायला गेला. महिलेने तिच्या दोन्ही मुलांना खोलीत झोपवलं आणि नंतर खोलीला बाहेरून कडी लावली. ती तिच्या प्रियकरासोबत दुसऱ्या खोलीत गेली. दोघे खोलीत असताना संबंधित महिलेच्या सासऱ्यांना खोलीतून काही आवाज ऐकू आला आणि त्यांना संशय आला. त्यावेळी, तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या सुनेला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिले आणि त्यांनी आरडाओरडा सुरू केला.

हे वाचलं का?

त्यानंतर शेजारचे लोक सुद्धा तिथे आले. त्यावेळी, लोकांनी महिलेच्या प्रियकराला काठ्या आणि लाथांनी बेदम मारहाण केली. संबंधित पुरूषाच्या फोनमध्ये सुद्धा त्या महिलेचे अश्लील व्हिडिओ आढळले. नंतर महिलेने मात्र, प्रियकराच्या विरुद्ध जबाब दिला. त्यावेळी, पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात पाठवलं. संबंधित महिला आणि तिचा प्रियकर वेगवेगळ्या समुदायाचे असल्याची माहिती समोर आली आहे.

दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध  

महुआखेडा परिसरातील एका वसाहतीत राहणाऱ्या एका पुरुषाच्या मृत्यूच्या बातमी समोर आली. त्यांना दोन मुलं असल्याची माहिती आहे. काही महिन्यांपूर्वी, तिने त्याच भागातील सोहिलशी फेसबुकवर मैत्री केली आणि त्याच्यासोबत चॅटिंग सुरू केलं. तो तरुण रंगकाम म्हणून काम करत असून महिलेने त्याला तिचं घर रंगविण्यासाठी बोलवलं होतं. दरम्यान, दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. तो तरुण तिच्या घरी वारंवार येऊ लागला. शुक्रवारी रात्री 1 वाजताच्या सुमारास महिलेने त्याला भेटण्यासाठी बोलावलं.

हे ही वाचा: मध्यरात्री सुनेच्या खोलीत सोडला साप अन्... केवळ ‘त्या’ एका मागणीमुळे सुनेवर जीवघेणा हल्ला! बहिणीने सगळंच सांगितलं...

संतापलेल्या लोकांनी मारहाण केली अन्... 

त्या दिवशी, त्या महिलेने मुलांना एका खोलीत झोपवलं. त्यानंतर ती महिला आणि तिचा प्रियकर दुसऱ्या खोलीत गेले. खोलीतून आवाज ऐकून आल्यावर महिलेचे सासरे जागे झाले. त्यांनी आपल्या सुनेला आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं आणि त्यांना संपूर्ण परिस्थिती समजली. त्यांनी आरडाओरडा करताच शेजारी सुद्धा घटनास्थळी आले. संतप्त लोकांनी प्रियकराला मारहाण केली.

हे ही वाचा: निष्पाप मुलीला फूस लावून खोलीत नेलं... 10 वर्षांच्या पीडितेवर सामूहिक बलात्कार! रडत रडत घरी आली अन्...

सासरच्या लोकांनी तक्रार नोंदवली  

पोलिसांनी आरोपीला जमावापासून सोडवण्यात यश मिळवलं. आरोपीच्या मोबाईल फोनवर महिलेचे अश्लील व्हिडिओ देखील आढळले. नंतर त्याला पोलिस ठाण्यात नेण्यात आलं. महिलेने चौकशी केली असता, तिने तिचे कोणतेही प्रेमसंबंध असल्याचं नाकारलं आणि तरुणाविरुद्ध जबाब दिला. महिलेच्या सासरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सोहिलविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. महिलेचा जबाब नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे.

    follow whatsapp