पोहायला जातो सांगून गेले अन् परतलेच नाही... 17 तासानंतर सापडले दोन्ही भावांचे मृतदेह

मुंबई तक

22 Jun 2025 (अपडेटेड: 22 Jun 2025, 09:58 AM)

सागर धूमाळ (वय 30) आणि अक्षय धुमाळ (वय 25) अशी मृतांची नावं आहेत. ही घटना शुक्रवारी (20 जून 2025) संध्याकाळी  घडली. त्यानंतर तब्बल 17 तासांच्या शोधमोहिमेनंतर शनिवारी (21 जून 2025) त्यांचे मृतदेह शोधण्यात यश आलं. 

Mumbai Tak
Google CTA

बातम्या हायलाइट

point

ठाण्यातील धक्कादायक घटना, दोन्ही भावांचा मृत्यू

point

पोहोयला जातो सांगून घरून निघाले आणि परतलेच नाही

point

दोन भावांसोबत नक्की काय घडलं?

Thane News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात नदी, नाले, ओढ्यांना पूर आला आहे. त्यातच अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळीही ओलांडल्याचं पाहायला मिळालं. अशात अनेक ठिकाणी लोक वाहून गेल्याची, बुडल्याची घटना घडली. पुण्यातील इंद्रायणीवरील पूल तुटल्याचं प्रकरणही ताजंच आहे. अशातच ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील गोरसई गावाजवळ एक धक्कादायक घटना घडली. दुथडी भरून वाहणाऱ्या कामवारी नदीत पोहताना दोन सख्ख्या भावांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. 

हे वाचलं का?

सागर धूमाळ (वय 30) आणि अक्षय धुमाळ (वय 25) अशी मृतांची नावं आहेत. ही घटना शुक्रवारी (20 जून 2025) संध्याकाळी  घडली. त्यानंतर तब्बल 17 तासांच्या शोधमोहिमेनंतर शनिवारी (21 जून 2025) त्यांचे मृतदेह शोधण्यात यश आलं. 

हे ही वाचा >> मुंबईत मुसळधार पावसाचा धमाका! वाहतुकीवरही होणार परिणाम? कसं असेल आजचं हवामान? जाणून घ्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी सागर आणि अक्षय हे दोघे भाऊ नदीत पोहायला गेले होते. पोहताना ते पाण्यात बुडाले. स्थानिकांनी याची माहिती दिल्यानंतर भिवंडी महानगरपालिकेचे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक तरुणांच्या मदतीने सुमारे 17 तास चाललेल्या शोधमोहिमेनंतर दोन्ही भावांचे मृतदेह शनिवारी सापडले. 

हे ही वाचा >> संपत्तीवरुन वाद, सावत्र भावाला संपवलं आणि मृतदेह जंगलात फेकला... पोलिसांनी कसा केला तपास?

मृतदेहांना भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवण्यात आलं. स्थानिकांनी सांगितले की, दोन्ही भाऊ नदीत पोहायला गेले होते, तेव्हा ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर धूमाळ कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अधिक तपास सुरू केला आहे.