UP Crime News : उत्तर प्रदेशातील बांदा येथे एनडीपीएस कायद्यांतर्गत तुरुंगात असलेला आरोपी न्यायालयात सुनावणीसाठी आणल्यानंतर पोलिसांना चकवा देऊन फरार झाल्याची घटना समोर आली आहे. संजय असे या आरोपीचे नाव असून, 14 ऑगस्ट रोजी न्यायालय परिसरात ही घटना घडली. संजयला जेलमधून बांदा न्यायालयात आणण्यात आले होते. न्यायालय परिसरातील हवालातीत त्याला ठेवण्यात आले होते आणि त्याच्यावर पोलिसांची नजर होती. सर्व काही सुरळीत सुरू असताना संजयने पोलिस कर्मचाऱ्याला बाथरूमला जायचे असल्याचे सांगितले. पोलिस कर्मचाऱ्याने त्याला बाथरूमला जाण्याची परवानगी दिली. मात्र, बाथरूमला गेलेला संजय पुन्हा परतलाच नाही. सुरुवातीला पोलिस कर्मचाऱ्याला तो परत येईल असे वाटले. मात्र बराच वेळ उलटूनही संजय परत न आल्याने त्याला संशय आला आणि त्यानंतर आरोपीचा शोध सुरू करण्यात आला.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Independence Day LIVE: स्वातंत्र्य दिनाचा सोहळा, लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन
बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने आरोपी पळाला
संजय हा खप्टिहा कला गावचा रहिवासी असून, गांजा तस्करीच्या प्रकरणात आरोपी आहे. त्याच्याविरोधात चिल्ला पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. जून महिन्यापासून तो तुरुंगात होता. 14 ऑगस्ट रोजी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी जेलमधून बांदा येथे आणण्यात आले होते. न्यायालय परिसरातील हवालातीत त्याला ठेवण्यात आले होते. यावेळी त्याच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी पोलिस कर्मचारी तैनात होते. मात्र बाथरूमला जाण्याच्या बहाण्याने संजयने पोलिसांना चकवा दिला आणि तेथून पळ काढला. बराच वेळ होऊनही तो परत न आल्याने पोलिसांनी त्याचा परिसरात शोध सुरू केला. न्यायालय परिसर तसेच आजूबाजूच्या ठिकाणी त्याचा शोध घेण्यात आला, मात्र त्याचा ठावठिकाणा लागला नाही.
हेही वाचा : बागेत आढळला गर्भवती तरुणीचा मृतदेह, दोन प्रियकरांवर गुन्हा; गर्भ नेमका कुणाचा?
आरोपीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न सुरू
संजय फरार झाल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांच्या चार टीम तैनात करण्यात आल्या आहेत. एसपी पलाश बंसल यांच्या निर्देशानुसार या टीमकडून संजयचा शोध घेतला जात आहे. न्यायालय परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी केली जात आहे. तसेच सर्व्हिलन्स टीमच्या माध्यमातून आरोपीचे लोकेशन शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांकडून आसपासच्या ठिकाणीही आरोपीचा शोध घेतला जात आहे. संजय नेमका कुठे गेला, याचा शोध घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या सीसीटीव्ही फुटेजसह सर्व्हिलन्सच्या मदतीने तपास केला जात आहे. आरोपीला लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, आरोपीच्या शोधासोबतच त्याच्या सुरक्षेसाठी आणि देखरेखीसाठी तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी केली जाणार आहे. एसपींनी पोलिस टीमच्या ड्युटीबाबत तसेच संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. बांदाचे एएसपी शिवराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या शोधासाठी अनेक टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सीसीटीव्ही आणि सर्व्हिलन्सच्या मदतीने त्याची लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोपीच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू असून, या प्रकरणात गुन्हा दाखल करून कारवाई केली जात आहे.
ADVERTISEMENT












