Crime News : उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत भयानक घटना घडली आहे. येथे चार महिन्यांपूर्वी घरातून शाळेसाठी निघालेली 14 वर्षांची नववीत शिकणारी विद्यार्थिनी अचानक बेपत्ता झाली होती. ती घरी न परतल्याने नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र मुलगी न सापडल्याने कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली.
ADVERTISEMENT
तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी सर्व्हिलन्स आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने त्या अल्पवयीन मुलीचा शोध घेतला. मुलीकडे केलेल्या चौकशीत असे समोर आले की, वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये 10 जणांनी तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी मुलीचा जबाब नोंदवून तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी 4 जणांना तुरुंगात पाठवण्यात आले असून इतर 6 जणांची चौकशी सुरू आहे.
शाळेला गेली अन् परतलीच नाही
गोरखपूरच्या चौरी चौरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी पीडित विद्यार्थिनी आपल्या आजारी आईसोबत एकटीच राहत होती. नातेवाईकांनी चौकशीत सांगितले की, मुलीचे वडील गुजरातमध्ये मजुरी करतात, त्यामुळे मुलीला शिकवण्यासाठी तिची मावशी तिला चौरी चौरा परिसरातील आपल्या घरी घेऊन गेली होती. 1 नोव्हेंबर 2025 रोजी ती शाळेला गेली आणि परतलीच नाही. एक आठवडाभर कुटुंब आणि नातेवाईक तिचा शोध घेत राहिले. मुलगी न सापडल्याने कुटुंबीयांनी 7 नोव्हेंबर रोजी ती बेपत्ता झाल्याची केस नोंदवली. गुन्हा नोंदवल्यानंतर पोलीस तपासात गुंतले. सीसीटीव्ही आणि सर्व्हिलन्सच्या मदतीने पोलीस मुलीपर्यंत पोहोचले. 4 महिन्यांनंतर 23 मार्च रोजी मुलीला शोधून काढण्यात आले.
हे ही वाचा : मला उभा चिरला तरी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही, खासदार फुटणार असल्याच्या बातम्या पाहून अरविंद सावंत संतापले
10 जणांनी केला बलात्कार
चौकशी दरम्यान तिने सांगितले की, 'जेव्हा मी 1 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता शाळेत जाण्यासाठी घरून निघाले, तेव्हा वाटेत ओळखीचा रिक्षाचालक मनीष राजभर (उर्फ मोनू) भेटला. त्याने फसवून रिक्षात बसवले आणि एका बांधकाम सुरु असलेल्या घरात नेले. तिथे त्याने बलात्कार केला. काही वेळाने त्याचे दोन मित्रही तिथे आले आणि त्या दोघांनीही अत्याचार केला. त्यानंतर ते लोक तिला रस्त्यावर सोडून पळून गेले.'
मुलीने पुढे पोलिसांना सांगितले की, त्यानंतर ती घरी न जाता रामगडताल येथे गेली. तिथे ती बराच वेळ काळजीत बसून होती. याच दरम्यान त्या ठिकाणी तिला एक तरुण भेटला. त्याच्या बोलण्याला भुलून ती त्याच्या घरी गेली. त्या तरुणाने मुलीला एक महिना घरात ठेवले आणि तिच्यावर बलात्कार करत राहिला. त्यानेही आपल्या दोन-तीन मित्रांना बोलावले ज्यांनी तिच्यावर बलात्कार केला. मुलीने बलात्कार करणाऱ्या 10 जणांचा उल्लेख केला आहे.
हे ही वाचा : प्रेयसीची मंगळसूत्राने गळा आवळून हत्या, लिव्ह इन पार्टनरने क्रूरपणे संपवलं, कानाखाली मारल्याने सुरु झालेला वाद
कॉल डिटेल्समध्ये धक्कादायक माहिती
मुलीच्या जबाबानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मुलीचे कॉल डिटेल्स तपासले, ज्यातून धक्कादायक माहिती समोर आली. पोलीस तपासात असे निष्पन्न झाले की, तिला अनेक हॉटेल्समध्ये नेले गेले होते. अनेक लोकांची नावे समोर आली. तातडीने कारवाई करत पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेतले. यामध्ये आरोपी हॉटेल चालक धर्मराज, रिक्षाचालक मनीष राजभर, तसेच समीर आणि किशन यांना अटक करून त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले. याप्रकरणी पुढील कारवाई सुरू आहे.
ADVERTISEMENT











