Crime News : उत्तर प्रदेशमधील कानपूरमधील बिठूर भागात एक संशयास्पद आणि खळबळजनक घटना समोर आली आहे. इथल्या एका अपार्टमेंटच्या सहाव्या मजलावरून पडून 22 वर्षीय संभव खंडेलवाल या तरुणाचा मृत्यू झाला आहे. संभव हा स्थानिक कागद व्यावसायिक विशाल खंडेलवाल यांचा एकुलता एक मुलगा होता आणि तो वडिलांच्या व्यवसायात मदत करायचा. शनिवारी (14 नोव्हेंबर) दुपारी तो मैत्रिणीला भेटण्याच्या बहाण्याने घरातून बाहेर पडला होता, मात्र काही तासांतच त्याच्या अपघाती मृत्यूची बातमी आल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ADVERTISEMENT
परस्परविरोधी दावे
या घटनेबाबत मृत तरुणीच्या कुटुंबाने आणि संभवच्या कुटुंबियांनी पूर्णपणे परस्परविरोधी दावे केले आहेत. मुलीच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, संभव घरी आला असता बाल्कनीत खेळताना चेंडू घेण्यासाठी जात असताना तेलावर पाय घसरल्यामुळे हा अपघात घडला. या विपरीत, संभवच्या कुटुंबीयांनी या दाव्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. मृतदेहावर असलेल्या गंभीर जखमा आणि मारहाणीच्या खुणा पाहता त्याला जाणीवपूर्वक धक्का देऊन खाली फेकल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
हे ही वाचा : Govt Jobs : सरकारने जाहीर केली तलाठी पदांसाठी मेगाभरती, काय आहेत पात्रतेचे निकष?
'डोन्ट कम...'
या प्रकरणाला अधिक गूढ बनवणारी बाब म्हणजे संभवच्या मोबाईल फोनमधील डेटा आणि चॅट्स डिलीट असल्याचे समोर आले आहे. मृत्यूपूर्वी दुपारी दोन वाजता मुलीच्या नंबरवरून 'डोंट कम' (Don't Come) असा संदेश आल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. या संशयास्पद मेसेजमुळे आणि डिलीट केलेल्या चॅट्समुळे घातपाताचा संशय आणखी बळावला असून, यामागील सत्य काय आहे हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
हे ही वाचा : एक इंजेक्शन अन् 17 वर्षीय प्राचीचा मृत्यू, संतापलेल्या लोकांनी मेडिकलला लावली आग; नेमकं प्रकरण काय?
पोलीस तपास काय सांगतो?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन कसून पाहणी केली असून पुरावे गोळा केले आहेत. पोलिसांनी मृतदेह विच्छेदनासाठी पाठवला असून सर्व बाजूने सखोल तपास सुरू आहे. आता फॉरेन्सिक अहवाल, शवविच्छेदन अहवाल आणि मोबाईलच्या तांत्रिक तपासातूनच संभवच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून त्यानंतरच पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.
ADVERTISEMENT












