Pune Crime: घरासमोर लघुशंका करताना थांबवलं, पुण्यात मुजोर तरूणांनी महिलेचा जीवच घेतला..

Pune Crime: पुण्यात घरासमोर लघवी करण्यास थांबवल्याच्या वादातून एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. महिलेच्या पतीने काही लोकांना घरासमोर लघवी करण्यास मनाई केली होती, यावरून वाद झाला आणि नंतर दगडफेक झाली.

Mumbai Tak

मुंबई तक

• 08:55 PM • 02 Jan 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

घरासमोर लघवी करण्यास थांबवल्याने मोठा वाद

point

तरूणांनी दाम्पत्यावर केला तुफान हल्ला

point

हल्ल्यात महिलेचा दुर्दैवी मृत्यू, पुण्यातील लोणी-काळभोरमधील घटना

Pune Crime: पुणे: पुण्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीला घरासमोर लघुशंका करण्यास थांबविल्यावरून प्रचंड मोठा वाद झाला. ज्यामध्ये एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना पुण्यातील लोणी काळभोर येथे घडली असून त्यात शीतल अक्षय चव्हाण या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. तर अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

हे वाचलं का?

नेमकी घटना काय?

ही घटना 27 डिसेंबर 2024 रोजी घडली आणि गंभीर जखमी झालेल्या शीतलचा बुधवारी (1 जानेवारी) मृत्यू झाला. याबाबत शीतलचा पती अक्षय याने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. डीसीपी राजकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे.

हे ही वाचा>> Thane Jail : कैद्याची एक चप्पल जड आणि एक हलकी वाटली...अधिकाऱ्यांनी तपास केला असता ठाणे कारागृहात काय सापडलं?

वास्तविक, पुणे-सोलापूर महामार्गावर थेऊर परिसरात हॉटेल आहे. या हॉटेलच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत अक्षय चव्हाण हे पत्नी शीतल चव्हाण व कुटुंबासह राहतात. अक्षय त्याच ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.

याच ठिकाणी 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी सहा-सात तरुण कारमधून खाली उतरले. काही लोक मोकळ्या जागेवर ते लघवी करू लागले. अक्षय चव्हाण याने त्यांना तसं करण्यास अडवलं. ज्यावरून बराच वाद झाला. ज्याचं रुपांतर हे हाणामारीमध्ये झालं. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामार झाली. दरम्यान, आरोपींनी चव्हाण कुटुंबीयांवर जोरदार दगडफेक सुरू केली. दरम्यान, एकाने पिस्तुल काढून हवेत गोळीबारही केला.

दगडफेकीत शीतल चव्हाण या गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण काल (1 जानेवारी) त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

हे ही वाचा>> Nashik Crime : शेजाऱ्यासोबचा वाद विकोपाला, बाप-बेट्यांनी खून केला, मृताचं शीर कापून थेट पोलीस स्टेशनमध्येच...

शीतलच्या मृत्यूचे वृत्त समजल्यानंतर तिच्या कुटुंबीय मोठा धक्का बसला. एका क्षुल्लक कारणावरून शीतलला तिचा जीव गमवावा लागल्याने तिचे कुटुंबीय मात्र प्रचंड संतापलेले दिसून आले. याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या लोणी काळभोर पोलीस इतर दोघांचा शोध घेत आहेत.