Crime News: दिल्लीमध्ये एका तरुणाने त्याच्या प्रेयसीची निर्घृणपणे हत्या केल्याचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे. येथील नरेला परिसरात इंजिनीयर म्हणून कार्यरत असलेल्या एका तरुणाने इमारतीच्या 6 व्या मजल्यावरुन आपल्या प्रेयसीला धक्का दिला आणि त्यात पीडित तरुणीचा मृत्यू झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असता त्यांना रक्ताच्या थारोळ्यात तरुणीचा मृतदेह आढळला. तसेच, पीडितेच्या शरीरावर मारहाण केल्याच्या जखमा देखील होत्या.
ADVERTISEMENT
6 व्या मजल्यावरून धक्का दिला...
प्रकरणातील 32 वर्षीय आरोपीचं नाव दीपक असून त्याने त्याच्या प्रेयसीला इमारतीच्या 6 व्या मजल्यावरून धक्का दिला आणि त्यात तरुणीचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बुधवारी (30 जुलै) पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय साधना सिंग अशी मृत तरुणीची ओळख पटवण्यात आली आहे. पीडिता ही हरियाणाच्या फरीदाबादमध्ये फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत होती. आरोपी दीपक आणि साधना उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये एकत्र राहत असल्याची माहिती आहे.
प्रेयसी नेहमी घरी भेटायला यायची
पोलिसांच्या माहितीनुसार, दीपक नोएडामधील एक कंपनीमध्ये इंजिनीयर म्हणून कार्यरत होता. त्यानंतर नुकतंच त्याने दिल्लीतील कोंडलीमध्ये दुसऱ्या कंपनीत नोकरी करण्यास सुरुवात केली होती. यादरम्यान, तो दिल्लीतील नरेलामधील एका फ्लॅटमध्ये राहू लागला आणि त्याची प्रेयसी साधना त्याला नेहमी त्याच्या फ्लॅटमध्ये भेटायला यायची.
हे ही वाचा: 6 महिन्यांच्या गर्भवती पत्नीची निर्दयी हत्या! दारूच्या नशेत दांडक्याने बेदम मारहाण अन् जागीच...
वादाचं रूपांतर मारहाणीत झालं
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवशी साधना दीपकला भेटायला त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी दीपकच्या घरच्यांनी त्याच्या लग्नासाठी एक मुलगी बघितली असल्याची साधनाला माहिती मिळाली. यानंतर, दुसऱ्या दिवशी दीपकच्या लग्नावरुन दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि या वादाचं रूपांतर मारहाणीत झालं. दरम्यान, दीपकने तिची प्रेयसी साधनाला त्याच्या 6 व्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून धक्का दिल्याचं सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिली माहिती
पोलिसांना परिसरातील घराबाहेर एक महिला बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती मिळाली होती. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचले असता तिथे साधना सिंग मृतावस्थेत आढळली. रक्ताच्या थारोळ्यात पीडित तरुणीचा मृतदेह आढळून आला आणि त्यावर मारहाणीच्या खुणा तसेच तिचे कपडे फाटलेले दिसून आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे ही वाचा: रमीने होत्याचं नव्हतं केलं.. अखेर माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं काढून घेतलं! नवे कृषी मंत्री कोण?
पोलीस उपायुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 103(1) (खून) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीची चौकशी सुरू आहे.
ADVERTISEMENT
