Opinion Poll : अशोक चव्हाणांना घेऊनही भाजपची जागा धोक्यात; शिंदेंना 'इथे' बसणार झटका?

मुंबई तक

17 Apr 2024 (अपडेटेड: 17 Apr 2024, 11:28 AM)

Maharashtra Opinion Poll, Marathwada lok sabha seats : मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात काय लागू शकतो निकाल?

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण.

मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात काय स्थिती... ओपिनियन पोलमध्ये कौल कुणाला?

follow google news

Opinion Poll Maharashtra : यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात आश्चर्याचा धक्का देणार निकाल येतील, असे ओपिनियन पोलचे कौल सांगत आहेत. नांदेडमधील लोकसभेची जागा जिंकण्यासाठी भाजपने अशोक चव्हाणांना सोबत घेतले, पण ही रणनीती निष्फळ ठरताना दिसत आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेंना उमेदवार बदलूनही फटका बसणार असल्याचे अंदाज आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात कुणाची सरशी होऊ शकते, जाणून घ्या... 

हे वाचलं का?

ABP C-Voter चा ओपिनियन पोल 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध झाला. या पोलनुसार मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी महायुतीला धक्का बसताना दिसत आहे. तर काही ठिकाणी महायुती गुलाल उधळेल.

मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघ : कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?

हिंगोली (चुरशीची लढत)

बाबुराव कोहळीकर -शिवसेना (शिंदे गट) - पिछाडीवर 
नागेश पाटील-आष्टीकर - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर

नांदेड (चुरशीची लढत)

प्रतापराव चिखलीकर - भाजप - पिछाडीवर 
वसंतराव चव्हाण - काँग्रेस - आघाडीवर

हेही वाचा >> उत्तम जानकरांनी वाढवली भाजपची धडधड, पवारांची घेतली भेट

परभणी (सोपा विजय)

महादेव जानकर - रासप - पिछाडीवर
संजय जाधव - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर

जालना (सोपा विजय) 

रावसाहेब दानवे - भाजप - आघाडीवर
कल्याण काळे - काँग्रेस - पिछाडीवर

औरंगाबाद  (चुरशीची लढत)

चंद्रकांत खैरे - शिवसेना (ठाकरे गट) - आघाडीवर
इम्तियाज जलील - एमआयएम - पिछाडीवर
अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर नाही

हेही वाचा >> महाराष्ट्रातील 48 मतदारसंघामध्ये कोण जिंकणार? बघा संपूर्ण यादी

बीड (चुरशीची लढत)

पंकजा मुंडे - भाजप - आघाडीवर
बजरंग सोनावणे - राष्ट्रवादी (शरद पवार) - पिछाडीवर 

धाराशिव (सोपा विजय)

अर्जना पाटील - राष्ट्रवादी (अजित पवार) - पिछाडीवर
ओमराजे निंबाळकर - शिवसेना (शिंदे गट) - आघाडीवर

लातूर (सोपा विजय)

सुधाकर श्रृंगारे - भाजप - आघाडीवर
शिवाजीराव काळगे - काँग्रेस - पिछाडीवर

भाजपने चव्हाणांना घेतलं पक्षात, तर शिंदेंनी बदलला उमेदवार

लोकसभा निवडणुकीत नांदेडमध्ये प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नांदेडमधील निकाल लक्षात घेऊन भाजपने अशोक चव्हाण यांना पक्षात घेतले. पण, त्यांचा फारसा फायदा होताना दिसत नाही.

हेही वाचा >> अजितदादांना मोठा झटका, बारामतीतून सुप्रिया सुळे आघाडीवर

नांदेडमध्ये काँग्रेस-महाविकास आघाडीला अनुकूल वातावरण असल्याचे आणि तसेच निकाल येतील, असे ओपिनियन पोलने म्हटले आहे. ओपिनियन पोलनुसार नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखली हे पिछाडीवर असून, काँग्रेसचे वसंतराव चव्हाण हे आघाडीवर आहेत. 

हिंगोली बदलला उमेदवार

गेल्यावेळी हिंगोली लोकसभात मतदारसंघातून हेमंत पाटील हे जिंकले होते. मात्र, यावेळी त्यांना पुन्हा उमेदवारी देण्यास भाजपने विरोध केला. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी त्यांच्याऐवजी बाबुराव कदम-कोहळीकर यांना तिकीट दिले. तर त्यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेने नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी दिलेली आहे. ओपिनियन पोलनुसार या निवडणुकीत आष्टीकर हे आघाडीवर असून, कोहळीकर पिछाडीवर आहेत. त्यामुळे उमेदवार बदलण्याची रणनीती फसणार असंच दिसतंय. 

    follow whatsapp