Lok Sabha Election 2024: भाजपला 272 जागा मिळाल्या नाही तर.. शरद पवारांचं मोठं विधान

मुंबई तक

22 May 2024 (अपडेटेड: 22 May 2024, 09:32 PM)

Sharad Pawar and BJP: भाजपला बहुमत मिळालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार पक्ष) भाजपसोबत जाणार की नाही याविषयी शरद पवारांनी मोठं विधान केलं आहे.

भाजपसोबत जाणार का? शरद पवारांचं मोठं विधान

भाजपसोबत जाणार का? शरद पवारांचं मोठं विधान

follow google news

Sharad Pawar: मुंबई: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) नंतर देशातील सत्ता नेमका कोणाला मिळणार यावर सगळीकडेच जोरदार सत्ता सुरू आहे. अनेक राजकीय जाणकार, विरोधी पक्षातील नेते यांच्या मते देशात मोदींची लाट नाही. त्यामुळे भाजपला बहुमताचा आकडा गाठता येणार नाही. जर निकालानंतर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर शरद पवार नेमकं काय करणार? याच प्रश्नावर पवारांनी थेट उत्तर दिलं आहे. (lok sabha election 2024 even if bjp does not get 272 seats we will not go with bjp sharad pawar big statement)

हे वाचलं का?

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. ज्यामध्ये त्यांनी एक कळीचा प्रश्न शरद पवारांना विचारला. यंदाच्या निवडणुकीत 272 पेक्षा कमी भाजपच्या जागा आल्या आणि तुम्हाला त्यांनी साद घातली तरी तुमचा पक्ष त्यांच्यासोबत जाणार का? असा सवाल पवारांना विचारण्यात आला. 

यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले.. 'काही कारणच नाही.. कारण त्यांची धोरणंच आम्हाला पसंत नाहीत. मी मघाशीच तुम्हाला सांगितलंय व्यक्तिगत संबंध राहतील. व्यक्तिगत सलोखा, संबंध आणि राजकीय निर्णय यामध्ये जमीन आस्मानचा फरक आहे. उद्या संसदेत.. मी अजून राज्यसभेत आहे.. भेट झाली त्यांची तर आम्ही बोलणार नाही असं नाही.. पण याचा अर्थ उद्या संसदेत मी त्यांच्या बाजूने हात नाही वर करणार' असं शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.


हे ही वाचा>> 'संधी असेल तर पुरेपूर फायदा घ्यायचा...', पवारांचा मास्टर प्लॅन!

भाजप नेते आणि अजित पवार स्वत: आणि त्यांच्या नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा दावा केला आहे की, शरद पवार यांनी अनेकदा भाजपसोबत एकत्र येण्याबाबत चर्चा केली आहे. पण ऐनवेळी ते माघार घेतात. 

मात्र, आता शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, ते किंवा त्यांचा पक्ष हा भाजपसोबत जाईल. 

'उद्धव ठाकरे भाजप आणि मोदीसोबत जाणार नाहीत.. नाहीत.. नाहीत'

दरम्यान, याच मुलाखतीत शरद पवार यांना हाच प्रश्न उद्धव ठाकरेंबाबतही विचारण्यात आला. त्यावर पवार म्हणाले की, 'अजिबात शक्यता नाही.. अजिबात म्हणजे अजिबात शक्यता नाही. उद्धव ठाकरे हे भाजप आणि मोदींसोबत जाणार नाहीत.. नाहीत.. नाहीत..' 

हे ही वाचा>> भाजपचा होणार मोठा विजय! अमेरिकेतील विश्लेषकाने सांगितला आकडा

शरद पवार यांच्या या विधानांचा अर्थ लक्षात घेतल्यास देशातील सत्ता मिळविण्यासाठी त्यांनी स्वत: वेगळ्या पद्धतीने रणनिती बनवली आहे. महाराष्ट्रात 2019 विधानसभा निवडणुकीनंतर ज्या पद्धतीने शरद पवारांनी वेगळी खेळी करून भाजपला सत्तेपासून दूर सारलं तशाच पद्धतीची खेळी खेळण्याचा आता पुन्हा एकदा पवारांचा मानस असल्याचं दिसतं आहे.

    follow whatsapp