Mohan Bhagwat : "मणिपूरकडे लक्ष द्या, सहमतीने देश चालवा", RSS ने पिळले केंद्राचे कान

RSS Chief Mohan Bhagwat on manipur : सरसंघचालक मोहन भागवत यांनी नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर काही मुद्द्यांवरून सरकारला सुनावले आहे.

Mumbai Tak

मोहन भागवत यांनी मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारला अप्रत्यक्षपणे सल्ला दिला आहे.

योगेश पांडे

11 Jun 2024 (अपडेटेड: 11 Jun 2024, 10:11 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत

point

मणिपूर हिंसाचाराचा भागवत यांनी मांडला मुद्दा

RSS chief Mohan Bhagwat expresses concern On Manipur : पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्र सरकारचे कान पिळले. हिसाचाराने होरपळत असलेल्या मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याला प्राधान्य द्यावे, असे सुनावले आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू असतात त्यामुळे विरोधकांचे मत महत्त्वाचे आहे. अहंकार नको, सहमतीने देश चालवा", असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले. (Manipur should be given priority says RSS Chief Mohan Bhagwat)

हे वाचलं का?

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्गाचा समारोप झाला. रेशीमबाग मैदानात झालेल्या कार्यक्रमात संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

सरसंघचालक मोहन भागवत काय म्हणाले?

"देशात शांतता हवी. समाजात वाद नको. एका वर्षांपासून मणिपूर शांतता प्रस्थापित होण्याची वाट बघत आहेत. त्याच्या आधी १० वर्ष शांत होतं. जुने गन कल्चर (बंदूक संस्कृती) संपली असे वाटले. अचानक तिथे निर्माण झाला किंवा निर्माण करण्यात आला. त्याच्या आगीत अजून जळतोय. होरपळत आहे. त्याकडे कोण लक्ष देणार? त्यामुळे त्याचा विचार करणे, हे कर्तव्य आहे."

हेही वाचा >> तटकरेंनी टोचले भुजबळांचे कान!

"मागील दहा वर्षांमध्ये देशाची आर्थिक, सामरिक परिस्थिती सुधारली आहे. जगात देशाचे नाव उंचावले आहे. कला, संस्कृती, क्रीडा, विज्ञान या क्षेत्रात आपण प्रगती करतोय. पण, याचा अर्थ आपल्यापुढची सर्व आव्हाने संपली आहेत, असा नाही. ती संपवण्यासाठी देश सहमतीने चालवायला हवा. केलेल्या कामाचा अहंकार न ठेवता प्रतिपक्षाच्या मतांचा आदर करत देश चालवावा."

देश सहमतीने चालवा -मोहन भागवत

सरसंघचालक भागवत म्हणाले की, "लोक संसदेत जातील. एकत्र बसून देश चालवतील. सहमतीने देश चालवा. सहमतीने काम करण्याची आपली परंपरा आहे. संसद कशासाठी आहे? दोन पक्ष का आहेत. यासाठी आहे कारण एका नाण्याच्या दोन बाजू असतात. तसेच कोणत्याही प्रश्नाच्या दोन बाजू आहेत. एक पक्ष एक विचार बाजू मांडतो. दुसरा त्यांचे मत प्रदर्शित करतो. त्यासाठी संसद आहे."

हेही वाचा >> देशाचे नवे कृषी आणि आरोग्य मंत्री कोण? सगळी यादी जशीच्या तशी

विरोधक हे विरोधी नाहीत, ते प्रतिपक्ष आहेत. त्यांचा विचार व्हायला हवा. असे चालले तर निवडणूक लढवायलाही मर्यादा येते. त्या मर्यादेचे पालन झालेले नाही. त्याचे पालन व्हायला हवे कारण आपल्या समस्या संपल्या नाहीत. एनडीए सरकार पुन्हा आले आहे", असे मोहन भागवत म्हणाले आहेत. 

    follow whatsapp