Manoj Jarange : महायुती सरकारचं टेन्शन वाढलं! जरांगे पाटलांची मोठी घोषणा

प्रशांत गोमाणे

30 Mar 2024 (अपडेटेड: 30 Mar 2024, 09:51 PM)

Manoj jarange Patil On Lok Sabha 2024 : विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागण्याची सूचना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केल्या आहेत. तसेच मराठा समाज अपक्ष उमेदवारही देणार नाही. तुम्हाला ज्याला पाडायचय त्याला पाडा, असे आवाहन देखील मराठा समाजाला केले आहे.

manoj jarange patil on lok sabha election 2024 maratha reservation vidhan sabha election

तुम्हाला ज्याला पाडायचय त्याला पाडा

follow google news

Manoj jarange Patil On Lok Sabha 2024 : लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची भाषा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी काही महिन्यापुर्वी केली होती. मात्र या घोषणेनंतर आता मनोज जरांगे पाटलांनी लोकसभेतून माघार घेतली आहे. त्याऐवजी विधानसभा निवडणूकीच्या तयारीला लागण्याची सूचना जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केल्या आहेत. तसेच मराठा समाज अपक्ष उमेदवारही देणार नाही. तुम्हाला ज्याला पाडायचय त्याला पाडा, असे आवाहन देखील जरांगे पाटलांनी मराठा समाजाला केले आहे. जरांगे पाटलांच्या (Manoj jarange Patil) या आवाहनानंतर महायुती सरकारचं टेन्शन वाढलं आहे.  (manoj jarange patil on lok sabha election 2024 maratha reservation vidhan sabha election) 

हे वाचलं का?

मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत बोलत होते. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीवर आपली भूमिका स्पष्ट केली. ''राजकारणाच्या नादात मी माझी जात हरू देणार नाही. पण या आव्हानावर उमेदवार देता येणार नाही. अपक्ष उमेदवारही देता येणार नाही. मराठा समाजाने त्यांचा निर्णय घ्यायचा आहे. कोणत्याही नेत्याच्या सभेला जायचं नाही. मी कुठेही प्रचाराला जाणार नाही. माझा कोणालाही पाठिंबा नाही. लोकसभेत कोणाला पाडायचंय त्याला पाडा'', असा थेट आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केले आहे. 

हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : बारामतीत नणंद विरुद्द भावजय लढत, पण कुणाचं पारड जड?

तसेच सगेसोयरेची अंमलबजावणी झाली नाही तर आताच विधानसभेची तयारी करायची. आम्ही 112 पेक्षा अधिक विधानसभेच्या जागा लढणार आहोत,अशी घोषणा देखील जरांगे पाटलांनी केली. तुम्ही काहीच करत नाही आम्हाला राजकारणात ढकलत आहात.ही वेळ तुम्हीच माझ्यावर आणताय, असे जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटले.

हे ही वाचा : Mahadev Jankar: बारामती, माढा नव्हे तर 'या' जागेवरून जानकर लोकसभा लढवणार

''मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आमची माया खूप होती. ते कोणत्या पक्षातून कुठे गेले याचे मराठ्यांना काही देणे घेणे नाही. शिंदे साहेब आम्हाला आरक्षण देतील, असे आम्ही म्हणायचो. पण ते मराठ्यांच्या मनातून उतरले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मी सहा महिने काहीच बोललो नाही, तरी ते गुन्हे दाखल करत आहेत'', असे विधान करत जरांगे पाटील यांनी शिंदे आणि फडणवीसांवर नाराजी व्यक्त केली. 
 

 

    follow whatsapp