Lok Sabha Election 2024 : बारामतीत नणंद विरुद्द भावजय लढत, पण कुणाचं पारड जड?
Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. पण याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून बंडाचा झेडा फडकावला होता.
ADVERTISEMENT
Sunetra Pawar vs Supriya Sule : बारामती लोकसभा मतदार संघातून शरद पवारांनी सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर काहीच तासात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी घोषित केली गेली. त्यामुळे आता बारामती लोकसभा मतदार संघात पवार विरूद्ध पवार लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान आता बारामती लोकसभा मतदार संघात नेमकं आता कुणाचं पारड जड आहे. हे जाणून घेऊयात. (ajit pawar ncp declare sunetra pawar candidancy from baramati lok sabha constituncy supriya sule sharad pawar ncp maharashtra politics)
ADVERTISEMENT
सुनेत्रा पवार यांना उमेदवारी जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून भिगवन चौकामध्ये फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या समर्थन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. आता बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात थेट लढत होणार आहे. पण याआधी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून बंडाचा झेडा फडकावला होता. शिवतारे अजित पवारांशी त्यांचा जुना बदला घेतील अशीही चर्चा होती. त्यानुसार शिवतारे बारामती लोकसभा लढवण्यावर ठाम होते.
हे ही वाचा : पवारांच्या NCP उमेदवारांची घोषणा, पाहा संपूर्ण यादी
मात्र दोनच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत विजय शिवतारे यांची नाराजी दुर करण्यात आली. त्यानंतर आज शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व कटूता बाजूला सारून बारामतीतून सूनेत्रा पवार यांना बहुमताने निवडून आणण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आता बारामतीत शिवतारेंची तलवार देखील म्यान करण्यात महायुतीला यश आले आहे.त्यामुळे अजित पवारांच्या उमेदवारासमोरच मोठं संकट दुर झालं आहे.
हे वाचलं का?
तसेच याआधी महादेव जानकरच्या रूपाने महायुतीसमोर मोठं आव्हान होतं. कारण जानकरांना जवळ करून शरद पवार माढ्यातून आणि बारामतीत मोठी खेळी करण्याची तयारी करत होते. कारण जानकर हे धनगर समाजाचे आहेत. आणि बारामतीत धनगर समाज मोठा आहे. त्यामुळे जानकरांच्या मदतीने शरद पवार मोठी खेळी करणार होते. मात्र महायुतीने आता महादेव जानकरांना देखील आघाडीत घेतली आहे. तसेच त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा दिली आहे. त्यामुळे आता परभणी लोकसभा मतदार संघातून महादेव जानकर महायुतीचे अधिकृत उमेदवार असणार आहे. महादेव जानकरांचे आव्हान देखील आता महायुतीने संपवले आहे.
हे ही वाचा : Mahadev Jankar: बारामती, माढा नव्हे तर 'या' जागेवरून जानकर लोकसभा लढवणार
खरं तर सुनेत्रा पवारांसमोरची ही दोन मोठी आव्हाने अजित पवारांनी हाणून पाडली आहे. त्यामुळे आता सुनेत्रा पवार विरूद्द सुप्रिया सुळे लढत कशी होणार? बारामतीतून कोण विजयी होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT