Lok Sabha Election 2024 : शरद पवारांची PM मोदींवर जोरदार टीका, ''संविधानावर हल्ला...''

प्रशांत गोमाणे

23 Mar 2024 (अपडेटेड: 23 Mar 2024, 03:00 PM)

Sharad pawar criticize pm narendra modi: केजरीवाल चमत्कारीक मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आदर्श शाळा, आदर्श दवाखाने काढले. त्यांचे निवडणुकीत 80 पैकी 78 नेते निवडुन आले. इतका लोकप्रिय मुख्यमंत्री तुरुंगात आहे, कारण पंतप्रधान मोदींवर टीका करतात.

sharad pawar criticize pm narendra modi on indafur farmar program indapur supriya sule baramati candidate lok sabha election 2024

केजरीवाल चमत्कारीक मुख्यमंत्री आहेत.

follow google news

Sharad pawar criticize pm narendra modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा बारामतीत प्रचार सूरू आहे. यानिमित्त आज इंदापूरमधील शेतकरी मेळाव्यातून शरद पवारांनी (Sharad Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीकास्त्र डागलं. मोदी सरकार 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते, आता 2024 सुरू आहे, पण अजूनही दुप्पट झालेलं नाही, अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.  (sharad pawar criticize pm narendra modi on indafur farmar program indapur supriya sule baramati candidate lok sabha election 2024) 

हे वाचलं का?

इंदापूरमधील शेतकरी मेळाव्यात शरद पवार बोलत होते.यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशाची आणि राज्याची सत्ता कुणाच्या हातात द्यायची. हा आपल्यासमोर मोठा प्रश्न आहे. देशात सध्या भाजपची सत्ता आहे. सत्तेचा वापर करून बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांना घटनेच्या आधारावर मुलभूत अधिकार दिला. त्या संविधानावर आणि मुलभूत अधिकारावर हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यावर तुम्हाला जागरूक राहण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन शरद पवारांनी नागरीकांना केले. 

हे ही वाचा : 'माझ्यासाठी त्यांनी अजूनही एक काम केलेलं नाही'; अमित ठाकरेंनी 'त्या' गोष्टीची व्यक्त केली खंत!

मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली पण ती काय पुर्ण केली नाही.2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. आज 2024 सुरु आहे, पण अजूनही उत्पन्न दुप्पट झालेल नाही, अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर केली. 

यावेळी शरद पवारांनी कांद्याच्या भावासंदर्भात किस्साही सांगितला. माझ्याकडे त्यावेळेला शेतीचा खात्याच काम होतं. आम्ही कांदा परदेशात पाठवला. त्याचा परिणाम असा झाला की कांद्याचे भाव वाढले. कांद्याचे भाव वाढल्यानंतर पार्लमेंटमध्ये मी पाहिलं, उत्पादक चांद्याचा माळा घालतोय तिकडे भाजपवाले कांद्याच्या माळा घालून आले आणि म्हणायला लागले. ''शरद पवार होश मे आओ प्याज किंमत निचे लाओ...''दंगा केला त्यांनी. त्यानंतर मला भाव खाली आणण्याबाबत खुलासा करण्यास सांगितले. त्यावेळी मी कृषिमंत्री असे पर्यंत कांद्याचे भाव खाली येऊ देणार नाही. तुम्ही गळ्यात कांद्याच्या माळा घाला की कवड्याच्या माला घाला, आमचे धोरण बदलणार नाही, अशी भूमिका घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. 

हे ही वाचा : इलेक्टोरल बाँड्समधून भाजपला सर्वाधिक देणगी देणाऱ्या ‘मेघा इंजिनीअरिंग’चे महाराष्ट्र कनेक्शन काय?

 शरद पवारांनी केजरीवालांच्या अटकेवरही यावेळी भाष्य केले.  केजरीवाल चमत्कारीक मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आदर्श शाळा, आदर्श दवाखाने काढले. त्यांचे निवडणुकीत 80 पैकी 78 नेते निवडुन आले. इतका लोकप्रिय मुख्यमंत्री तुरुंगात आहे, कारण पंतप्रधान मोदींवर टीका करतात. त्यामुळे लोकप्रतिनिधींना तुरुंगात टाकून दडपशाही सुरू आहे, अशी टीका शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर केली. 

    follow whatsapp