इलेक्टोरल बाँड्समधून भाजपला सर्वाधिक देणगी देणाऱ्या ‘मेघा इंजिनीअरिंग’चे महाराष्ट्र कनेक्शन काय?

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Electoral Bonds : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने इलेक्टोरल बाँडशी संबंधित संपूर्ण डेटा निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, SBI ने निर्धारित मुदतीपूर्वी म्हणजेच 21 मार्च रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत इलेक्टोरल बाँडसंबंधीत सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे. यानंतर हा डेटा निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरही अपलोड केला आहे. (What is the Maharashtra connection of megha engineering and infrastructures ltd which gave the highest donation to BJP among electoral bonds) 

ADVERTISEMENT

यावरून कोणत्या राजकीय पक्षाला कोणत्या कंपनीने किती निवडणूक देणगी दिली हे उघड झाले. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना कोट्यवधी रुपयांची देणगी देणाऱ्या अनेक कंपन्या असल्याचे नव्या आकडेवारीतून समोर आले आहे. मेघा ग्रुप हा इलेक्टोरल बाँड्सच्या सर्वात मोठ्या खरेदीदारांपैकी एक आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी Megha Engineering and Infrastructure Limited (MEIL) ही हैदराबादस्थित कंपनी आहे. 

माहितीनुसार, महाराष्ट्र प्रकल्पापूर्वी या कंपनीने कोट्यवधींचे इलेक्टोरल बाँड खरेदी केले होते. मेघा इंजिनिअरिंगने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना सर्वाधिक देणग्या दिल्या आहेत. हैदराबाद नोंदणीकृत कंपनी मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड हे इलेक्टोरल बाँड्सच्या सर्वाधिक खरेदीदारांपैकी एक आहे. त्यांनी विकत घेतलेल्या एकूण 966 कोटी किंमतीच्या इलेक्टोरल बाँड्सपैकी सुमारे साठ टक्के म्हणजेच 584 कोटींचे इलेक्टोरल बाँड भाजपकडे आहेत.

हे वाचलं का?

एमईआयएलने मुंबईतील सुमारे 1800 कोटी रुपयांचे सिमेंट काँक्रीट रस्त्याचे कंत्राट मिळवले आणि कामात विलंब केल्याबद्दल बृहन्मुंबई महानगरपालिकेने दंड आकारला होता. कंपनीने संयुक्त उपक्रमात BKC येथील बुलेट ट्रेन स्टेशनचे कंत्राटही मिळवले.

MEIL ने गेल्या वर्षी 14,400 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली ट्विन टनेल प्रकल्पासाठी टेंडर मिळण्याच्या एक महिना अगोदर 11 एप्रिल 2023 रोजी 140 कोटी रुपयांचे इलेक्टोरल बॉंड खरेदी केले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान दुहेरी बोगदा प्रकल्प हा 11.84 किमीचा ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प आहे, जो दोन पॅकेजमध्ये विभागलेला आहे. तो पूर्ण होण्यासाठी चार वर्षांची मुदत आहे.

ADVERTISEMENT

MEIL महाराष्ट्रातील बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC), MMRDA (मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) आणि MSRDC सारख्या नागरी संस्थांसोबत काम करते. त्यांच्याकडे केंद्र सरकारचे अनेक अभियांत्रिकी प्रकल्प कंत्राटेही आहेत.

ADVERTISEMENT

कंपनीने बीआरएस (भारत राष्ट्र समिती) साठी खरेदी केलेल्या इलेक्टोरल बॉंडमध्ये आणखी एक मोठा भाग होता ज्याची किंमत 195 कोटी रुपये होती. तेलंगणामध्ये देखील MEIL चे राज्य सरकारसोबत अनेक अभियांत्रिकी करार आहेत. MEIL ने DMK ला 85 कोटी रुपये, YSRCP ला 37 कोटी रुपये, JD(S) ने 5 कोटी रुपये दिले आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व प्रादेशिक राज्य पक्ष आहेत, भाजप व्यतिरिक्त फक्त इतर राष्ट्रीय पक्ष ज्यात MEIL ने निवडणूक बाँडद्वारे योगदान दिले ते काँग्रेस पक्ष होते. कंपनीने काँग्रेसला 18 कोटी रुपयांची देणगी दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT