Shiv Sena 1st List : शिवसेनेची पहिली यादी जाहीर, हेमंत गोडसेंना धक्का

प्रशांत गोमाणे

28 Mar 2024 (अपडेटेड: 28 Mar 2024, 07:46 PM)

Shiv Sena 1st List : भापजने त्यांच्या 23 जागांवर उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकनाथ शिंदे यांनी 8 जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.

shiv sena eknath shinde 8 seat candidate deaclare hemant godse chhagan bhujbal nashik lok sabha constituncy

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे.

follow google news

Shiv Sena 1st List : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknaths shinde) यांच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर झाली आहे. या पहिल्या यादीत एकनाथ शिंदे यांनी 8 जागांवर उमेदवार जाहीर केली आहे. शिंदे यांनी दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, शिर्डी, बुलढाणा, हिंगोली, रामटेक, हातकणंगले आणि मावळ या जागांवर आपले उमेदवार घोषित केले आहेत. या यादीत नाशिकच्या जागेचा उल्लेखच नाही. त्यामुळे हेमंत गोडसेंना धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (shiv sena eknath shinde 8 seat candidate deaclare hemant godse chhagan bhujbal nashik lok sabha constituncy)  

हे वाचलं का?

भापजने त्यांच्या 23 जागांवर उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत एकनाथ शिंदे यांनी 8 जागांवर उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. दक्षिण मध्य मुंबईतून - राहुल शेवाळे,  कोल्हापूर - संजय मंडलिक,  शिर्डी - सदाशिव लोखंडे, बुलढाणा - प्रतापराव जाधव, हिंगोली - हेमंत पाटील, रामटेक - राजू पारवे, हातकणंगले - धैर्यशील माने,  मावळ - श्रीरंग आप्पा बारणे या नेत्यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. 

हे ही वाचा : शिंदेंची मोठी खेळी, मुंबईतील 'या' नेत्याचं तिकीट कापणार?

शिवसेनेकडून 8 उमेदवारांची यादी जाहीर 

  • दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
  •  कोल्हापूर - संजय मंडलिक
  •  शिर्डी - सदाशिव लोखंडे
  •  बुलढाणा - प्रतापराव जाधव
  •  हिंगोली - हेमंत पाटील
  • रामटेक - राजू पारवे
  • हातकणंगले - धैर्यशील माने
  • मावळ - श्रीरंग आप्पा बारणे

नाशिकच्या उमेदवारीचं काय झालं? 

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे नाशिकची जागा लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र अद्याप गोडसेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले नव्हते. त्यामुळे गोडसेंनी शक्तिप्रदर्शन करण्यास सूरूवात केली होती. कार्यकर्त्यांसह ते ताफा घेऊन ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर नाशिकचा काही निकाल लागला नव्हता. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा ते वर्षावर दाखल झाले होते. मात्र तरी देखील शिंदे या जागेचा तिढा सोडवू शकले नाही आहे. 

खरं तर नाशिकच्या जागेवरून भाजपचं हायकमांड छगन भूजबळ यांना उमेदवारी देण्यास इच्छुक आहे. भाजपला छगन भुजबळ यांना ओबीसी चेहरा म्हणून पुढे आणायचे आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. त्यामुळेच कुठेतरी ही जागा मुख्यमंत्री शिंदे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या द्यावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जागेवरून थोडा पेच सुरू आहे. त्यामुळेच या जागेवर अद्याप उमेदवारी जाहीर करण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

हे ही वाचा : रात्रीत कसं फिरलं बारामतीचं राजकारण? पवार-शिवतारेंच्या एकीची Inside Story

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून हेमंत गोडसे शक्तिप्रदर्शन करत आहेत. मात्र भाजपच्या दिल्लीतील हायकमांडला जो चेहरा हवा आहे. त्यामुळे हेमंत गोडसे यांचा नाशिकमधून पत्ता कट होण्याची शक्यता आहे. 

    follow whatsapp