Raveena Tondon in Municipal corporation election: मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी निवडणुका पार पडल्या आणि काल म्हणजेच 16 जानेवारी रोजी याचा निकाल समोर आला. या निवडणुकीत भाजपा महायुती मताधिक्याने विजयी ठरली. तसेच, मुंबईतही भाजपाने बहुसंख्य मतांनी सत्ता मिळवली. निवडणुकीपूर्वी प्रचारात अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी भाग घेतला. यात 90 च्या दशकातील सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री रवीना टंडनने विशेष लक्ष वेधलं.
ADVERTISEMENT
11 वार्डात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय
रवीना टंडनने उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेसाठी (Shiv Sena UBT) सक्रियपणे प्रचार केला. वांद्रे पश्चिम प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवारासाठी ती घरोघरी जाऊन मत मागताना दिसली. गळ्यात मशाल चिन्हाचा पट्टा लावून त्या स्थानिक नागरिकांशी संवाद साधत होती. तिचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. शिवसैनिकांनी त्यांचं खूप कौतुक केलं. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या वॉर्डात रवीना ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करत होती, त्या वॉर्डात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला.
हे ही वाचा: 27 महापालिका जिंकू म्हणणारी भाजपा फक्त 9 ठिकाणी स्वबळावर तर 15 ठिकाणी कुबड्यावर...', सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
रवीना मतदान केंद्रावर दिसली नाही...
खरं तर, मतदानाच्या दिवशी (15 जानेवारी 2026) रवीना टंडन मतदान केंद्रावर दिसली नाही. जोरदार प्रचार करणारी अभिनेत्री ऐन वेळी कशी गायब झाली, असा प्रश्न अनेकांना पडला.
हे ही वाचा: '... काय चुकलं, काय राहून गेलं', मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची भावुक पोस्ट
अनेक बॉलीवूड कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला आणि त्यांनी चाहत्यांना आवाहन केलं. पण रवीना मात्र त्या दिवशी अनुपस्थित होती. यामुळे नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होऊ लागली. "प्रचार तर जोरात, पण नागरी जबाबदारी विसरली का?" असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित झाले. आता या अनुपस्थितीमागील खरे कारण समोर आले आहे. टीव्ही 9 च्या वृत्तानुसार, रवीनाच्या जवळच्या सूत्राने सांगितले की, घरात एक अचानक इमर्जन्सी उद्भवली. त्यामुळे तिला तात्काळ परदेशात जावं लागलं. रवीना नेहमीच आपल्या हक्कांबाबत आणि नागरी कर्तव्यांबाबत जागरूक असते.
ADVERTISEMENT











