Sushma Andhare Post: राज्यातील 29 महानगरपालिकांचा निकाल जाहीर झाला. मुंबईसह बहुसंख्य महापालिकांवर भाजपाने सत्ता मिळवली. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत भाजप महायुती बहुमत मिळवले. तसेच, गेली 25 वर्षे मुंबई महापालिकेवरील ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता भाजपने उलथवून लावली. आता या निकालानंतर, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
सुषमा अंधारे यांची पोस्ट जशीच्या तशी
"गावठी चाणक्यांनी एवढ्या सगळ्या स्वायत्त यंत्रणा अधीन ठेवून सुद्धा मुंबईत साधं शतक गाठता आलं नाहीं..!!
कोट्यावधींचा पाऊस पाडून फक्त 4 ...!!!
शिवसेना UBT चे 20/25 नगरसेवक होते. आज 65 आहेत.
मनसेचे 6 नगरसेवक हा फायदा वेगळाच!
शाहसेनेचे 53 नगरसेवक होते... आज 28 आहेत.
भाजपाचे 84 नगरसेवक होते. ते 4 ने वाढले
27 महापालिका आम्ही जिंकू म्हणणारी भाजपा प्रत्यक्षात फक्त 9 ठिकाणी स्वबळावर तर 15 ठिकाणी कुबड्यावर उभी राहण्याचा प्रयत्न करतेय.
काय भक्तुल्यानो, कळलं का ? बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही..!!"
हे ही वाचा: '... काय चुकलं, काय राहून गेलं', मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राज ठाकरेंची भावुक पोस्ट
महानगरपालिकांच्या या निकालानंतर, मनसे नेते अमित ठाकरे यांनी सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. अमित ठाकरे नेमकं काय म्हणाले? जाणून घ्या.
"मराठी माणसासाठी आमचा लढा सुरुच राहील !
निकाल काहीही असो... खंत एकाच गोष्टीची वाटते की, माझ्या मराठी माणसाला जे अपेक्षित होतं, ते देण्यासाठी मला कदाचित अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण एक लक्षात ठेवा, माझं आणि तुमचं नातं फक्त एका 'बटनापुरतं' किंवा 'मतापुरतं' कधीच नव्हतं. राजकारणात जय-पराजय होतच असतो, पण माणसांची मनं जिंकणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे.
तुम्ही आम्हाला जे प्रेम आणि साथ दिली, ती कोणत्याही सत्तेपेक्षा मोठी आहे. माझा शब्द आहे तुम्हाला... सत्ता असो किंवा नसो, तुमच्या हक्कासाठी महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक नेहमी धावून येतील. 'महाराष्ट्र' आणि 'मराठी' माणसाच्या हितासाठी आमचा लढा यापुढेही सुरुच राहील. खचून जाऊ नका... 'मराठी'ला आणि 'मराठी माणसाला' कधीच एकटं पडू देणार नाही... हा शब्द आहे ठाकरेंचा !
जय महाराष्ट्र"
ADVERTISEMENT











