Avinash Jadhav On Election Commission : राज्यातील 29 महानगरपालिकांच्या मतदानाला सुरुवात झाली असून अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड तर काही ठिकाणी मतदान केंद्र सापडण्यात अडचणी येत आहेत. अशातच मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील एका बॅनरवर शिवसेना शिंदे गटाचे चिन्ह स्पष्ट दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. तसेच निवडणूक आयोग शिवसेना शिंदे गटाच्या दावणीला बांधला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी, देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'निवडणूक आयोगाने..'
नेमका आरोप काय आहे?
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील निवडणूक अधिकारी वृषाली पाटील यांच्याविरोधात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. आचारसंहिता असूनही शिवसेना शिंदे गटाचे चिन्ह स्पष्टपणे दिसणारे बॅनर झळकत असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले आहे. हा निवडणूक आचारसंहितेचा भंग असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच निवडणूक आयोग शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
अविनाश जाधव यांची याचिका कोर्टाने फेटाळली
दरम्यान, राज्यातील महानगरपालिकांमध्ये 66 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते.यामध्ये भाजपच्या 44 तर शिवसेना शिंदे गटाच्या 19 उमेदवारांचा समावेश आहे. त्याविरोधात अविनाश जाधव यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र त्यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली. याचिकाकर्त्यांनी कोर्टात चुकीची विधाने केल्याचे सांगत कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.
हे ही वाचा : सगळंच संशयास्पद! निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, आमदार रोहित पवारांची मागणी; नेमकं काय घडलं?
आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास काय कारवाई होते?
राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान आणि 16 जानेवारी रोजी मतमोजणीचे नियोजन करण्यात आले आहे. या काळात आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास निवडणूक आयोग उमेदवाराला अपात्र ठरवू शकतो किंवा संबंधितांवर कायदेशीर गुन्हा दाखल करू शकतो.
ADVERTISEMENT











