सगळंच संशयास्पद! निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं, आमदार रोहित पवारांची मागणी; नेमकं काय घडलं?
Rohit Pawar on Election Commission : "पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही", असं आमदार रोहित पवारांनी म्हटलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राज्यभरात अनेक ठिकाणी ईव्हिएम मशीन बंद पडल्याचे प्रकार
आता रोहित पवारांची आयोगाकडे मोठी मागणी
Rohit Pawar on Election Commission : राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज (दि. 15) मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मात्र, काही ठिकाणी ईव्हीएम मशीन सुरु होत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत. अनेक ठिकाणी गोंधळाची परिस्थिती आहे. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत संशय व्यक्त केलाय. शिवाय त्यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केलीय. रोहित पवार नेमकं काय म्हणाले? सविस्तर जाणून घेऊयात...
रोहित पवार काय म्हणाले?
रोहित पवार म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यात अनेक ठिकाणी मतदानाची सुरवातच बंद मशीनने झाली, तर अनेक ठिकाणी EVM वरील वेळ सुमारे 15 मिनिटे उशिराची दाखवली जातेय, काही ठिकाणी तिसऱ्या उमेदवाराला मत दिल्याचं बटन दाबल्यानंतर लाईट लागते, काही ठिकाणी शेवटचं (चौथं) बटन दाबल्यानंतर आवाज येतो पण लाईट लागत नाही.. एकूणच हे सगळंच संशयास्पद आणि निवडणुकीबाबत अविश्वास निर्माण करणारं आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्टीकरण देऊन हा गोंधळ तातडीने दूर करावा आणि मतदान हे मुक्त व निर्भय वातावरणासह मत दिलेल्या उमेदवारांनाच ते गेलं पाहिजे, याची काळजी घ्यावी.









