Mahabharat fame karna actor Pankaj dheer died : मनोरंजन जगतातून आज (दि.15) सकाळी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. बी.आर. चोप्रांच्या ‘महाभारत’ मालिकेत कर्णाची अविस्मरणीय भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेले ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाले आहे. 14 ऑक्टोबरच्या मध्यरात्री त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपट आणि दूरदर्शन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. महाभारत मालिकेत कर्णच्या भूमिकेतून लोकांच्या मनात स्थान मिळवणारे पंकज धीर आता आपल्यात राहिलेले नाहीत. वयाच्या 68व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते. ते बराच काळ कर्करोगाशी झुंज देत होते. मात्र त्यांची कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अपयशी ठरली.
ADVERTISEMENT
बादशाह, सडक आणि Taarzan सिनेमात काम
पंकज धीर यांच्या खास भूमिका आवाजासाठी ओळखले जात होते. परंतु 1988 साली प्रसारित झालेल्या दूरदर्शनवरील महाभारत या मालिकेत त्यांनी कर्णाची भूमिका साकारली होती. ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. या भूमिकेमुळे ते घराघरात पोहोचले आणि आजही लोकांच्या मनात ‘दानवीर कर्ण’ म्हणून जिवंत आहेत. त्यांच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो की देशातील अनेक ठिकाणी त्यांच्या मूर्तींची पूजाही केली जात असे. त्यांनी ‘सडक’, ‘सोल्जर’, ‘बादशाह’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि दूरदर्शनवरही सतत सक्रिय राहिले. त्यांचा मुलगा निकितिन धीर हा देखील एक प्रसिद्ध अभिनेता आहे.
हेही वाचा : सनातन धर्म अस्पृश्यतेवर विश्वास ठेवतो अन् जीव घेतो, छळ केल्याने मृत्यू झालेल्या 5 जणांबाबत आंबेडकरांची पोस्ट
मिळालेल्या माहितीनुसार, पंकज धीर यांच्यावर आज (15 ऑक्टोबर) मुंबईतील विले पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या कुटुंबीयांसह चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनात ते सदैव ‘दानवीर कर्ण’ म्हणून जिवंत राहतील.
मुलगा आणि सून दोघेही कलाकार
पंकज धीर यांचा मुलगा निकितिन धीर हा बॉलीवूडमध्ये सक्रिय आहे. त्याने ‘जोधा अकबर’ आणि ‘चेन्नई एक्सप्रेस’ या चित्रपटांत लक्षवेधी कामगिरी केली होती. तर त्यांची सून कृतिका सेंगर ही लोकप्रिय दूरदर्शन अभिनेत्री आहे. विशेष म्हणजे, कृतिका हिची निवड निकितिनसाठी स्वतः पंकज धीर यांनीच केली होती. ही गोष्टही चर्चेचा विषय ठरली होती. वर्ष 2014 मध्ये पंकज धीर आपल्या दिग्दर्शनातील पहिल्या चित्रपटाच्या कामात व्यस्त होते. त्यावेळी कृतिका सेंगर ऑडिशन देण्यासाठी आली होती. त्या वेळी तिला चित्रपटात भूमिका देतानाच पंकज धीर तिच्यावर इतके प्रभावित झाले की तिलाच आपल्या मुलासाठी जोडीदार म्हणून निवडले. त्या निर्णयानंतर दोघांचे लग्न झाले आणि हे नाते चित्रपटसृष्टीत आदर्श मानले गेले.
हेही वाचा : विरार: प्रियकराने अश्लील फोटो दाखवून ब्लॅकमेल केलं... वडिलांना मारहाण! नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल
ADVERTISEMENT
