kbc junior contestant misbehaved with amitabh bachchan : टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध शो 'कौन बनेगा करोड़पती' प्रेक्षकांचा नेहमीच आवडता शो राहिला आहे. सध्या या शो च्या 17 व्या सिझनला सुरुवात झाली आहे. अनेक स्पर्धक या शोमधून करोडपती बनून गेले आहेत. या सिझनला देखील प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे, कारण शोचे होस्ट आणि बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा अंदाज प्रेक्षकांना विशेष आवडतो. दरम्यान, काही दिवसांपूर्वीचा एक एपिसोड खूप चर्चेत राहिला आहे. शोमध्ये आलेला एका मुलगा अमिताभ बच्चन यांच्याशी उर्मटपणे बोलत होता, त्यामुळे नेटकरी संताप व्यक्त करत आहेत.शिवाय, अतिआत्मविश्वासही या स्पर्धकाला नडल्याचं पाहायला मिळालं. कारण त्याला 4 प्रश्नांची बरोबर उत्तरं देता आली. मात्र, पाचव्या प्रश्नावेळीच त्याच्यावर बाहेर पडण्याची वेळ आली.
ADVERTISEMENT
काही दिवसांपूर्वी शूट झालेल्या एपिसोडमध्ये 'कौन बनेगा करोड़पति 17' या शो मध्ये गुजरातचा एक विद्यार्थी इशित हॉट सीटवर बसला. हॉट सीटवर पोहोचताच इशित खूप उत्साही दिसला. त्याचा उत्साह पाहून सुरुवातीला प्रेक्षकांना वाटले की मुलगा खूप प्रतिभावान आहे. पण गेम सुरू होताच मुलाने अमिताभ बच्चन यांच्याशी उर्मटपणे बोलण्यास सुरुवात केली.
अमिताभ बच्चन यांना दाखवला अॅटीट्यूड
हॉट सीटवर बसलेल्या इशितला शोचे होस्ट अमिताभ बच्चन यांनी विचारले की त्याला कसे वाटत आहे. यावर इशित म्हणतो, "मी खूप उत्साहित आहे. पण आपण सरळ पॉईंटवर येऊ या. मला गेमचे नियम समजावून सांगायची गरज नाही, कारण मला शोचे नियम आधीपासून माहीत आहेत." हे ऐकून अमिताभ बच्चन यांना देखील हसू आवरेना.
यानंतर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर अमिताभ बच्चन हसत पुढे जातात आणि खेळ सुरू ठेवतात. प्रश्नांचे उत्तर सांगत असताना मुलगा अमिताभ बच्चन यांचं बोलणं पूर्ण होण्याआधीच मध्येच बोलायला लागतो. अनेक वेळा बिग बी या वागणुकीकडे दुर्लक्ष करतात. पण अखेर हा मुलगा अतिआत्मविश्वासाने तोंडावर आपटतो. त्याला 5 व्या प्रश्नाचे योग्य उत्तर देता येत नाही.
मुलाच्या संस्कारांवर उठली चर्चा
सोशल मीडियावर मुलाच्या वागण्यामुळे नेटिझन्स संताप व्यक्त करत आहेत. प्रत्येकजण मुलाच्या संस्कारांवर चर्चा करू लागला. एका युझरने लिहिले, "मुलांना शिकवा पण त्याचबरोबर संस्कारही शिकवा." अनेक युझर्सनी अमिताभ बच्चन यांचं कौतुक केलं आहे. कारण त्यांनी मुलाच्या वागण्याकडे उत्तम प्रकारे दुर्लक्ष केले.
मुलाला कोणत्या प्रश्नाचे उत्तर देता आले नाही?
अमिताभ बच्चन यांनी विचारलेल्या 4 प्रश्नांची मुलाने योग्य उत्तरं दिली. मात्र, 5 वा प्रश्न होता की, "रामायणचा पहिला अध्याय कोणता होता?" याचे योग्य उत्तर होते बालकांड. पण मुलाने अयोध्याकांड असे उत्तर दिले, जे चुकीचे होते आणि त्यामुळे त्याने शोमध्ये जिंकलेली रक्कम गमावली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
