Jhund fame actor Babu Priyanshu Chhetri death : महानायक अमिताभ बच्चन यांच्या प्रसिद्ध चित्रपट "झुंड" मध्ये बाबू छेत्रीची भूमिका करणारा अभिनेता बाबू उर्फ प्रियांशू छेत्रीची नागपुरात हत्या करण्यात आली. नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन परिसरातील नारा परिसरात काल रात्री तारेने बांधून ही निर्घृण हत्या करण्यात आली. त्याची बहीण शिल्पा छेत्री हिच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि ध्रुव शाहू नावाच्या आरोपीला अटक केली.
ADVERTISEMENT
झोपडपट्टीतून सिनेक्षेत्रात, नागराज मंजुळेंच्या दोन सिनेमात काम
विशेष म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या दोन सिनेमात त्याने काम केलं होतं. झुंड आणि घर बंदुक बिर्याणी या सिनेमांमध्ये तो झळकला होता. घर बंदुक बिर्याणी या सिनेमाचं शूटींग सुरु होतं, तेव्हा तो चोरीच्या प्रकरणात जेलमध्ये होता. मात्र, सिनेमात काम करण्यासाठी तो तुरुंगातून बाहेर आला होता. त्याचा सिनेक्षेत्रातील प्रवास हा झोपडपट्टीतून सुरु झाला होता. नागराज मंजुळे त्यांचं वर्णन 'डँबिस बाबू' म्हणून करायचे.
'डँबिस बाबू' म्हणून नागराज मंजुळेंनी प्रियांशू छेत्रीचं वर्णन
नागराज मंजुळे यांनी बाबू म्हणजेच प्रियांशू छेत्रीबाबत एका मुलाखतीत भाष्य केलं होतं. बाबू कॅमेऱ्याला जुमानत नाही. तो त्याचा स्वभाव आहे. ही त्याची खूप भारी गोष्ट आहे. मी फक्त त्याला सांगतो की, फक्त रिस्पेक्ट ठेव. असाच मजबूत राहा. कोणाची काळजी करु नको. फक्त रिस्पेक्ट मात्र ठेव.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशू उर्फ बाबू छेत्री बुधवारी रात्री 3 वाजताच्या सुमारास जखमी अवस्थेत आणि तारेने बांधलेल्या अवस्थेत आढळला. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर जरीपटका पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांना मेयो रुग्णालयात दाखल केले. तथापि, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिस तपासात दिसून आले आहे की प्रियांशू उर्फ बाबू छेत्री यांच्यावर यापूर्वी चोरी आणि इतर गुन्हेगारी गुन्ह्यांचा गुन्हा दाखल होता. प्राथमिक तपासात हत्येमागे वैयक्तिक वैमनस्य असल्याचे दिसून आले आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे आणि एका आरोपीला अटक केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
मोठी बातमी : नागराज मंजुळेंच्या झुंड सिनेमातील अभिनेता प्रियांशू छेत्रीची हत्या, सिनेसृष्टी हादरली!
ADVERTISEMENT
