veteran actress madhumati passes away :दिग्गज अभिनेत्री आणि डान्सर मधुमती यांचं निधन झालं आहे. वयाच्या 87 व्या वर्षी त्यांनी आपल्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली आहे. मधुमती यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक संस्मरणीय चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये “आंखें”, “टॉवर हाऊस”, “शिकारी” आणि “मुझे जीने दो” यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्या एक अप्रतिम डान्सर होत्या आणि त्यांनी भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली अशा शास्त्रीय नृत्यप्रकारांचे शिक्षण घेतले होते.
ADVERTISEMENT
अभिनेता अक्षय कुमारने वाहिली श्रद्धांजली
विंदू दारा सिंग यांनीही मधुमतींचा एक सुंदर फोटो शेअर करत लिहिले ,“आमच्या गुरू आणि मार्गदर्शक मधुमतीजींच्या आत्म्यास शांती लाभो. आमच्यापैकी अनेकांनी या महान व्यक्तिमत्त्वाकडून डान्स शिकला आणि त्यांच्या प्रेम व आशीर्वादाने समृद्ध असे सुंदर आयुष्य जगलो.”
हेही वाचा : सुनेचा मृतदेह पाहाताच मोठा धक्का बसला, सासूनेही जागेवर जीव सोडला, संपूर्ण गाव हळहळलं
मधुमती यांच्या निधनावर अभिनेता अक्षय कुमार आणि विंदू दारा सिंग यांसारख्या अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे. अक्षय कुमार यांनी ‘एक्स’वर एक जुना फोटो शेअर करत लिहिले ,“माझ्या पहिल्या गुरूला श्रद्धांजली. नृत्याविषयी जे काही शिकलोय, ते सर्व त्यांच्या पायाशी राहून शिकलो. प्रत्येक अदा, माझ्या प्रत्येक कलाकृतीत तुमची आठवण कायम राहील. ओम शांती.”
अभिनेत्री मधमती यांची कारकीर्द
दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचा जन्म 1938 मध्ये महाराष्ट्रात झाला होता. त्यांनी 1957 मध्ये एका मराठी चित्रपटात नर्तिकेच्या भूमिकेतून आपला अभिनय प्रवास सुरू केला. लहानपणापासूनच त्यांना नृत्याची प्रचंड आवड होती. त्या प्रशिक्षित भरतनाट्यम, कथक, मणिपुरी आणि कथकली डान्सर होत्या. नृत्यासोबतच त्यांनी अभिनयातही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आणि आपल्या अभिनय कौशल्याने तसेच नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
19 वर्षांच्या वयात मधुमती यांनी दिग्गज डान्सर दीपक मनोहर यांच्याशी विवाह केला होता. दीपक मनोहर हे त्यांच्यापेक्षा वयाने मोठे होते आणि चार मुलांचे वडील होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले होते, परंतु मधुमतींच्या आईला हा विवाह मान्य नव्हता. मात्र मधुमती यांनी आपल्या आईच्या इच्छेच्या विरोधात जाऊन दीपक मनोहर यांच्याशी लग्न केलं होतं.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT
