Nana Patekar Demise : भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले. आज (8 ऑक्टोबर) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अचानक जाण्याने कलाक्षेत्रासह संपूर्ण महाराष्ट्रावर आणि देशभरातील चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
ADVERTISEMENT
'अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, "ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’ मनाला मोठा धक्का देणारी आहे. मन प्रचंड दुःखी आहे. नाना जितके पडद्यावर मोठे, तितकेच मनाने सुद्धा मोठे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीला त्यांनी एक कालखंड दिला. त्यातून प्रामुख्याने एक राष्ट्रभक्त अशीच त्यांची प्रतिमा प्रेक्षकांना भावली. 'क्रांतिवीर' ते 'नटसम्राट' या त्यांच्या प्रवासात जो दमदार आणि कसदार अभिनयाचा पट त्यांनी उभा केला, त्याला तोड नाही. त्यामुळे अभिनेता म्हणून त्यांचे जाणे ही मोठी हानी आहे.
परखडपणा, बेधडकपणा हे स्वभावगुण त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलवणारे ठरले. पण मी मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांच्यातील हळवा माणूस कायम पाहत आलो आहे. आम्ही जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, तेव्हा त्याला पाठिंबा देण्यासाठी स्वतः नाना पुढे आले होते. मकरंद अनासपुरेजी आणि त्यांनी सोबत येत 'नाम फाऊंडेशन'ची स्थापना केली आणि स्वतः शिवारात जाऊन काम केले. शेतकऱ्यांसाठी मदत करणे असो, दुष्काळी कालखंडात मदतीचा हात पुढे करणे असो, नाना कायम अग्रणी राहिले. यंदाही आपण दुष्काळाचा सामना करीत असताना नाना कधीच मागे राहिले नसते, पण ते अचानक सोडून निघून गेले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या, चाहत्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत."
नितीन गडकरी काय म्हणाले?
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नाना पाटेकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, "भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. 'नाम फाऊंडेशन'च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती."
हे ही वाचा : Personal Finance: जमीन न घेता जमीन व्यवसायात गुंतवणूक? कमी पैशात रिअल इस्टेटचा ‘हिस्सा’
पहाटे काय घडलं?
आज पहाटे नाना पाटेकर नाना पाटेकर यांना सकाळी छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. यानंतर वैद्यकीय पथकाला तातडीने त्यांच्या फ्लॅटवर पाठवण्यात आले. तेथे पोहोचल्यावर नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत आढळले. वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने कार्डियाक मसाज दिला आणि रुग्णालयात नेले, जिथे गोव्याच्या मणिपाल रुग्णालयातील वैद्यकीय पथकाने सकाळी 5:20 वाजता त्यांना मृत घोषित केले.
हे ही वाचा : PM मोदी रामाच्या अवतारात तर एकनाथ शिंदे चक्क हनुमानाच्या रूपात; शिवसेनेच्या सेलिब्रेशनची चर्चा!
प्रेक्षकांच्या मनावर गाजवले अधिराज्य
नाना पाटेकर यांच्या अशा अकस्मात जाण्याने मनोरंजन विश्वात कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. आपल्या दमदार अभिनयशैलीने आणि कणखर व्यक्तिमत्त्वाने त्यांनी अनेक दशके प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. या दुःखद प्रसंगी संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहते त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.
ADVERTISEMENT











