'मला अस्वस्थ वाटू लागलंय', नाना पाटेकरांनी पहाटे मित्राला कळवलं, गोव्यात काय घडलं?

मुंबई तक

08 Oct 2026 (अपडेटेड: 08 Oct 2026, 08:45 AM)

Nana Patekar death cause : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं गोव्यातील मणिपाल रुग्णालयात निधन झालं. त्यांना छातीत तीव्र वेदना झाल्यानंतर वैद्यकीय पथक त्यांच्या फ्लॅटवर पोहोचलं होतं. पुढे नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात..

Nana Patekar death cause

Nana Patekar death cause

Google CTA
▌

बातम्या हायलाइट

point

नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं कारण काय?

point

गोव्यात पहाटे काय घडलं?

Nana Patekar death cause : चित्रपटसृष्टीतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचं निधन झालं आहे. नाना पाटेकर यांचे पुत्र मल्हार पाटेकर यांनी त्यांच्या वडिलांच्या निधनाची पुष्टी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोव्यातील मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सकाळी 5.20 वाजता नाना पाटेकर यांना मृत घोषित केलं. नाना पाटेकर यांनी पहाटे सुमारे 3 वाजता गोव्यातील एका मित्राला अस्वस्थ वाटत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांच्या मित्राने त्यांच्या देखभाल करणाऱ्या व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवलं. रुग्णालयाकडून नंतर त्यांना आणण्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आली.

हे वाचलं का?

हेही वाचा : PM मोदी रामाच्या अवतारात तर एकनाथ शिंदे चक्क हनुमानाच्या रूपात; शिवसेनेच्या सेलिब्रेशनची चर्चा!

छातीत तीव्र वेदना अन् मित्राला कळवलं 

नाना पाटेकर यांना छातीत तीव्र वेदना होत होत्या. त्यानंतर वैद्यकीय पथक त्यांच्या फ्लॅटवर पोहोचलं. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत आढळले. वैद्यकीय पथकाने त्यांना कार्डियाक मसाज दिला आणि रुग्णालयात नेलं. रुग्णालयात त्यांना वाचवण्यासाठी सुमारे 45 मिनिटे प्रयत्न करण्यात आले. मात्र या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यानंतर मणिपाल रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने सकाळी 5.20 वाजता त्यांना मृत घोषित केलं. नाना पाटेकर हे रुग्णालयाचे रुग्ण नसल्यामुळे नियमानुसार रुग्णालयाला पोलिसांना माहिती देणं आवश्यक होतं.

हेही वाचा : काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिसांना दाखवला कात्रजचा घाट, राहुल गांधींना घेऊन जाणारी बसच केली पंक्चर

नाना पाटेकर यांच्या मृत्यूचं नेमकं कारण काय, याबाबत सध्या संपूर्ण माहिती समोर आलेली नाही. ही घटना वैद्यकीय-कायदेशीर प्रकरण असल्याने नियमानुसार त्यांच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. पोस्टमॉर्टेमसाठी त्यांचा मृतदेह गोवा मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला आहे. आज पोस्टमॉर्टेम करण्यात येणार आहे. त्यामुळे नाना पाटेकर यांच्या मृत्यूबाबतची पुढील माहिती पोस्टमॉर्टेमच्या प्रक्रियेनंतर समोर येणार आहे. सध्या त्यांना छातीत तीव्र वेदना झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, मल्हार पाटेकर यांनी ऑडिओ कॉलच्या माध्यमातून वडिलांच्या निधनाची पुष्टी केली आहे. ते पुण्यात होते आणि आता गोव्याला रवाना झाले आहेत. सध्या त्यांच्याकडे या घटनेची संपूर्ण माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. गोव्याला पोहोचल्यानंतर संपूर्ण माहिती घेऊन ती कळवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी अचानक समोर आलेल्या नाना पाटेकर यांच्या निधनाच्या बातमीने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. नाना पाटेकर आता आपल्यात नसल्याच्या बातमीवर विश्वास ठेवणं अनेकांना कठीण जात आहे. चित्रपटसृष्टीत शोकाचं वातावरण आहे.