होळीच्या ‘त्या’ ट्विटमुळे अक्षय कुमार झाला ट्रोल!

मुंबई तक

• 10:51 AM • 29 Mar 2021

देशात आज अनेक ठिकाणी होळी तसंच रंगपंचमीचा उत्साह पहायला मिळाला. कोरोनाच्या नियमांचं पालन करून धुळवड साजरी करण्यात आली. दरम्यान कोरोनाचं संकट असताना रंगपंचमी साजरी न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान याचसंदर्भात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केलं. मात्र त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर्सने त्याला ट्रोल केलंय. Do me a favour let’s not play […]

Mumbaitak
follow google news

देशात आज अनेक ठिकाणी होळी तसंच रंगपंचमीचा उत्साह पहायला मिळाला. कोरोनाच्या नियमांचं पालन करून धुळवड साजरी करण्यात आली. दरम्यान कोरोनाचं संकट असताना रंगपंचमी साजरी न करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. दरम्यान याचसंदर्भात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट केलं. मात्र त्याच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर युजर्सने त्याला ट्रोल केलंय.

हे वाचलं का?

अक्षय कुमार त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला, “माझ्यावर कृपा करा पण होळी खेळू नका. स्वतःच्या तसंच आपल्या प्रिय व्यक्तींच्या सुरक्षेसाठी घरीच होळी खेळा. तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.” महत्त्वाचं म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्षयने लोकांना असं आवाहन केलं होतं. मात्र यानंतर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.

अक्षयच्या या ट्विटनंतर #पूर्ण_बहिष्कारअक्षय_कुमार असा हॅशटॅगंही ट्रेड होऊ लागला. काहींनी हे सांगणारा अक्षय कुमार कोण आहे असं ट्विट करत आपली नाराजी दर्शवली आहे. तर एका युजरने, असा मेसेज ईदच्या वेळी का नाही केला…ईद साजरी करू नका असं अक्षय का नाही म्हणाला, असा सवाल केलाय. यावेळी चाहत्यांनी मात्र अक्षयची बाजू घेत कोरोनाच्या परिस्थितीमुळे त्याने अशा आशयाचं ट्विट केल्याचं म्हटलंय.

दरम्यान या ट्विटनंतर अक्षय कुमारने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याची मुलगी नितारा सुद्धा दिसतेय. अक्षय आणि त्याची मुलगी रंगपंचमी खेळले आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये अक्षय लिहीतो, “आपल्या आवडत्या लोकांसह उत्सव साजरा करण्यापेक्षा मोठा आनंद काहीच नाही.”

    follow whatsapp