18 January 2025 Horoscope In Marathi : वैदिक ज्योतिष शास्त्रात एकूण 12 राशींचं वर्णन केलं आहे. प्रत्येक राशीचा स्वामी ग्रह असतो. ग्रह-नक्षत्रांच्या स्थितीनुसार, राशी भविष्याचं वर्णन केलं जातं. 18 जानेवारीला शनिवार आहे. ज्योतिष गणनेनुसार 18 जानेवारी 2025 चा दिवस काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. तर काही राशींना समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ADVERTISEMENT
मेष राशी
मेष राशीच्या लोकांचं मन आज प्रसन्न असेल. कौंटुबीक जीवन सुखी असेल. संपत्तीत वाढ होऊ शकते. एखाद्या मित्राच्या मदतीने नवीन उद्योगधंदा सुरु करू शकता.
वृषभ राशी
वृषभ राशीच्या लोकांचं मन आज अशांत राहील. आत्मविश्वासात कमी राहील. घर-कुटुंबात धार्मिक कार्य होऊ शकतात. मुलांचं सहकार्य लाभेल.
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. उद्योगधंद्यात वाढ होईल. प्रेम-कुटुंबाची साथ मिळेल. आरोग्य चांगलं राहील. कुटुंबात प्रगती होईल.
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या संवादावर नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद मिळेल. वडिलांच्या सहकार्यामुळे उद्योगधंद्यात यश मिळेल. आर्थिक लाभ होईल.
हे ही वाचा >> Saif Ali Khan Case: सैफवर हल्ला केल्यानंतर चोरट्याने कपडे बदलले अन्...; 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
सिंह राशी
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ राहील. प्रवासाचा योग येईल. एखाद्या ठिकाणी पैसै अडकले असतील, तर ते पुन्हा मिळतील. आर्थिक उत्पन्नाचे नवीन मार्गही खुले होतील.
कन्या राशी
कन्या राशीच्या लोकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. उद्योगधंद्यात वाढ होईल. धनलाभ होईल. नवीन वाहन खरेदी करण्याचा योग येईल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या.
तुळा राशी
तुळा राशीच्या लोकांची व्यापारिक स्थिती सुदृढ होईल. नवव्यापाराची सुरुवातही होऊ शकते. आरोग्य पहिल्यापेक्षा चांगलं आहे. लव्ह लाईफमध्ये सुधारणा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीच्या लोकांना चढ-उताराचा सामना करावा लागेल. मन अशांत राहील. आरोग्य मध्यम स्वरुपाचं राहील. रागावर नियंत्रण ठेवा. एखादं पूर्ण झालेलं काम बिघडू शकतं.
हे ही वाचा >> Today Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांना फुटला घाम! 24 कॅरेट 80 हजारांपार, 22 कॅरेट...तुमच्या शहरात भाव काय?
धनू राशी
धनू राशीच्या लोकांना पार्टनरसोबत प्रवास करण्याचा योग असेल. धार्मिक कार्यात मन लागेल. आरोग्य मध्यम स्वरुपाचं राहील. पैशासंबंधीत समस्या निर्माण होऊ शकतात.
मकर राशी
मकर राशीच्या लोकांसाठी आज प्रतिकूल परिस्थिती आहे. आर्थिक गोष्टींची कोणतीही रिस्क घेऊ नका. आरोग्य खराब होऊ शकतं. व्यापारिक दृष्टीकोनातून आज सामान्य दिवस राहील.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या लोकांच्या संपत्तीत वाढ होऊ शकते. एखाद्या मित्राच्या सहकार्यामुळे नवीन उद्योगधंद्याची सुरुवात होऊ शकते. पार्टनरची खूप साथ मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते.
मीन राशी
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य स्वरुपाचा राहील. कार्यालयात तुम्ही आकर्षणाचा केंद्रबिंदू राहाल. जीवनात आवश्यकतेप्रमाणे गोष्टी उपलब्ध होतील.
ADVERTISEMENT











