TET पेपर लीक प्रकरण : तिघांना अटक, मुख्य आरोपी फरार, 1.5 कोटींचा रेट

TET Paper Leak Case : टीईटी पेपर लीक प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी फरार असून पोलिसांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे.

TET Paper Leak Case

TET Paper Leak Case

मिथिलेश गुप्ता

27 Jun 2026 (अपडेटेड: 27 Jun 2026, 04:58 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

TET पेपर लीक प्रकरण : तिघांना अटक,

point

मुख्य आरोपी फरार, 1.5 कोटींचा रेट

TET Paper Leak Case : टीईटी पेपर लीक प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.डीसीपी पवन बनसोड यांना टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे विक्री करण्यासाठी आणण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोनगाव परिसरात सापळा रचून सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास तिघांना ताब्यात घेतले.

हे वाचलं का?

हेही वाचा : मोठी बातमी : ठाण्यात TET चा पेपर फुटला, परीक्षा पुढे ढकलली, परिपत्रक जाहीर

आरोपींकडून टीईटी प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त  

आरोपींकडून टीईटी प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त करण्यात आले असून, त्यासोबतच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डही जप्त करण्यात आले आहेत. राजीव शाह (बिहार),  आकाश कुमार (बिहार) धीरज कुमार (हरियाणा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबतची माहिती अपर आयुक्त अशोक दुधे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(4), 316(5) आणि 61(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : नवऱ्याने बायकोला अश्लील व्हिडिओ दाखवले, नंतर अनैसर्गिक कृत्य केलं अन्..

आरोपी दिल्लीहून महाराष्ट्रात आले

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बिहारमधील राजीव शाह आणि आकाश कुमार तसेच हरियाणातील धीरज कुमार यांचा समावेश आहे. हे तिन्ही आरोपी दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्राथमिक तपासात प्रश्नपत्रिका दिल्लीहून आणण्यात आल्याचे समोर आले आहे. ही प्रश्नपत्रिका नेमकी कोणाला आणि कुठे विकली जाणार होती, याचा तपास सुरू असून त्यासाठी आरोपींकडून सखोल चौकशी केली जात आहे. या प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात सुमारे दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचेही तपासात समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे संघटित टोळी कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय असून त्यादृष्टीनेही तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणात ज्याचा सहभाग समोर येईल, त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. तपासासाठी दोन एसीपी आणि नऊ पोलिस निरीक्षकांचे विशेष पथक स्थापन करण्यात आले असून हे पथक तपासाच्या अनुषंगाने विविध राज्यांमध्ये जाऊन चौकशी करणार आहे. कोनगाव परिसरातून करण्यात आलेली ही कारवाई पुढील तपासासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

टीईटी परीक्षा पुढे ढकलली

दरम्यान, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत 28 जून 2026 रोजी राज्यभरातील 1028 परीक्षा केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आयोजित करण्यात येणार होती. मात्र, भिवंडीत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने प्रश्नपत्रिकेची पडताळणी केली. तपासात आरोपींकडे आढळलेल्या काही प्रश्नांचा टीईटी जून 2026 च्या प्रश्नपत्रिकेशी मेळ आढळल्याने भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. या पार्श्वभूमीवर परीक्षा पूर्ण पारदर्शक वातावरणात व्हावी आणि प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, या उद्देशाने 28 जून रोजी होणारी शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेबाबतची अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.