Today Gold Rate: सोनं खरेदी करणाऱ्यांना फुटला घाम! 24 कॅरेट 80 हजारांपार, 22 कॅरेट...तुमच्या शहरात भाव काय?
Today Gold Rate In India: सोनं खरेदी करणाऱ्यांना फुटला घाम! 24 कॅरेट 80 हजारांपार, 22 कॅरेट...तुमच्या शहरात भाव काय? सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

सोनं खरेदी करणाऱ्यांचं टेन्शन वाढलं!

24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या भाव वाचून थक्क व्हाल

मुंबईत आज 1 तोळ्याचा भाव काय?
Today Gold Rate In India: सोनं खरेदी करणाऱ्यांना फुटला घाम! 24 कॅरेट 80 हजारांपार, 22 कॅरेट...तुमच्या शहरात भाव काय?
सोन्याच्या भावात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याचे दर दररोज ग्रीन अलर्टने समोर येत आहेत. भारतात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 80 हजार रुपये झाले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 74 हजारांपुढे गेली आहे.
चांदीच्या भावातही वाढ झाल्याचं समोर आलंय. आज एक किलोग्रॅम चांदीचे भाव 2000 रुपयांनी वाढले आहेत. देशात एक किलोग्रॅम चांदीचे भाव 95500 रुपये झाले आहेत. वर्ष 2024 मध्ये एक किलोग्रॅम चांदीचे दर 1 लाखांपुढे गेले होते. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याते भाव काय आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दिल्ली
दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 80770 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 74050 रुपयांवर पोहोचले आहेत.
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 80070 रुपये झाली आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 73900 रुपयांवर पोहोचले आहेत.