"ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र.. पंतप्रधान पद", उद्धव ठाकरेंनी उडवून दिली मोठी खळबळ

मुंबई तक

27 Jun 2026 (अपडेटेड: 27 Jun 2026, 08:55 PM)

Uddhav Thackeray : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज 27 जून 2026 रोजी हिंगोली शहरात सभा घेतली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ऑपरेशन टायगरवर भाष्य केलं, त्यानंतर त्यांनी शिंदे गटासह एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता टीकेची तोफ डागली. त्यानंतर त्यांनी अमित शहांच्या पंतप्रधान पदाबाबत मोठी खळबळ उडवून दिली.

Uddhav Thackeray

Uddhav Thackeray

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

point

"ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र"

Uddhav Thackeray : "ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, कारण एक पंजा जर टायगरनं मारला तर त्यांची सर्व आतडी बाहेर निघतील. हे ऑपरेशन टायगर नाही, तर हे ऑपरेशन देवेंद्र आहे. देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येतील. म्हणूनच आताच त्यांचे पंख कापून टाका. महाराष्ट्रातून एकही माणूस हा दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये, त्याला तिथेच गुंतवून ठेवलं आहे. यासाठीच शिवसेनेचे खासदार फोडून त्यांना आमित शहा मिंधेकडे पाठवतो, हा माझा समज आहे," असे उद्धव ठाकरे यांनी हिंगोलीच्या सभेत 27 जून 2026 रोजी उपस्थितांना संबोधित करत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला.

हे वाचलं का?

हे ही वाचा : Crime News : भाच्याचा मामाच्या पोरीवर जीव, विवाह केला अन् मामानं कट रचून...

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरे म्हणाले की, "हिंगोली मतदारसंघात आधीचाही खासदार गेला, त्यांच्या तोंडाला हळद नाही काळं फासलं आहे. एक तर आतल्या दारातून गेला. विशेष करून हिंगोली आणि परभणी या मतदारसंघातील प्रतिनिधी गेला तरीही मतदार शिवसेनेसोबत राहिलेला आहे. मात्र, मिंधेसेना ही नमक हराम आहे, कारण नमक हराम अशा अर्थाने कारण त्यांच्यावर तुमच्यासह इतर लोकांनी उपकार केले, तो मिंधे नमक हराम आहे. काय बाकी ठेवलं होतं, चार वर्षांपूर्वी 50 खोके दिले होते, आता किती माहिती नाही.", असं म्हणत त्यांनी टीकेची तोफ डागली.

"शिवसेनेचं अस्तित्व हे आमदार खासदारांवरती नाही"

नंतर बोलताना ते म्हणाले की, "शिवसेनेचं अस्तित्व हे आमदार खासदारांवरती नाही, शिवसेनेचं अस्तित्व हे जनतेवरती आणि शिवसैनिकांवरती अवलंबून आहे. एक शिष्ठमंडळ भेटलं आणि एकाने निवेदन दिलं. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा. इथला खासदार गेला तो बोलेल का या शक्तीपीठ महामार्गाबाबत?" असा प्रश्न करत त्यांनी चांगलं सुनावलं. 

"रस्त्यावरती कोण? तुम्ही आणि आम्हीच. मी माफी मागायला आलो, खासदार फुटलेत फुटू द्या, आपण नवीन खासदार निवडून आणू, नव्याने आमदार देखील आणू. तुमच्यासोबत कोणीही आमदार खासदार नसला तरीही हा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिल. माझी बांधिलकी ही सत्तेशी नाही, माझी बांधिलकी फुटीरांशी नाही. माझी बांधिलकी ही तुमच्याशी आहे," असं ते म्हणाले. 

"ऑपरेशन टायगर नाही, हे ऑपरेशन देवेंद्र"

नंतर पुढे त्यांनी ऑपरेशन टायगरबाबत सांगितलं की, "ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, कारण एक पंजा जर टायगरवर मारला तर त्यांची सर्व आतडी बाहेर निघतील. हे ऑपरेशन टायगर नाही, तर हे ऑपरेशन देवेंद्र आहे. देवेंद्र फडणवीस येणाऱ्या काळात पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरतील. म्हणूनच आताच त्यांचे पंख कापून टाका. महाराष्ट्रातून एकही माणूस हा दिल्लीपर्यंत पोहोचता कामा नये,त्याला तिथेच गुंतवून ठेवलं आहे. यासाठीच शिवसेनेचे खासदार फोडून त्यांना आमित शहा मिंधेकडे पाठवले, हा माझा समज आहे", असं म्हणत त्यांनी मोठी राजकीय खळबळ उडवून दिली. 

हे ही वाचा : वऱ्याने बायकोला अश्लील व्हिडिओ दाखवले, नंतर अनैसर्गिक कृत्य केलं अन्..

निवडणूक नसताना तुम्ही खासदार का फोडलेत? तुम्ही ते खासदार फोडून स्वत:कडे न घेता, उद्या अमित शहा यांना पंतप्रधान करण्यासाठी हे खासदार मतदान करतील. ही पुढची व्यवस्था आहे.