केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर, म्हणाले, 'एक स्ट्राँग व्यवस्था...'

मुंबई तक

26 Jun 2026 (अपडेटेड: 26 Jun 2026, 01:05 PM)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतन अग्रवाल हत्या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. याविषयी बोलताना हे अत्यंत धक्कादायक प्रकरण असून मुला-मुलींमध्ये सूडबुद्धी नेमकी का तयार होत आहे असा सवाल त्यांनी विचारला. फडणवीस नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

Devendra Fadnavis On Agarawal Murder Case

Devendra Fadnavis On Agarawal Murder Case

Google CTA

बातम्या हायलाइट

point

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर,

point

म्हणाले, 'एक स्ट्राँग व्यवस्था...'

Devendra Fadnavis On Agarawal Murder Case : केतन अग्रवाल हत्या प्रकरणानं चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले हे अत्यंत धक्कादायक प्रकरण असून मुला-मुलींमध्ये सूडबुद्धी नेमकी का तयार होत आहे असा सवाल त्यांनी विचारला. याविषयी फडणवीस नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.

हे वाचलं का?

'समाज म्हणून विचार करण्याची आवश्यकता' 

अग्रवाल हत्या प्रकरणी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'अतिशय धक्कादायक अशा प्रकारची घटना आहे. अनाकलनीय अशा प्रकारची ही घटना आहे. खरं तर समाज म्हणून कुठेतरी आपल्याला विचार करण्याची आवश्यकता आहे की, शिकल्या-सवरलेल्या चांगल्या घरच्या मुला-मुलींमध्ये अशा प्रकारची दुर्बुद्धी आणि अशाप्रकारची सूडबुद्धी ही नेमकी का तयार होतेय, याच्या पाठीमागची कारणं काय आहेत?' 

हे ही वाचा : जैन समाजाकडून राज ठाकरेंना लेखी माफीनामा, शिवतीर्थवर काय घडलं?

'सूडबुद्धी तयार होऊ नये'

मुला-मुलींमध्ये तयार होणाऱ्या सूडबुद्धीविषयी बोलताना ते म्हणाले की, 'मला असं वाटतं की याला केवळ गुन्हेगारीचा अँगल नाही, तर एक सामाजिक अँगल देखील आपल्याला त्याच्यामध्ये बघावा लागेल. आणि समाजाची पण एक स्ट्राँग व्यवस्था उभी करावी लागेल, की अशा पद्धतीची सूडबुद्धी या इतक्या तरुण वयातल्या मुला-मुलींमध्ये तयार होऊ नये. पण एकूणच ही घटना अत्यंत धक्कादायक आहे.'

हे ही वाचा : “धाराशिव लोकसभा मतदारसंघात 4.5 लाख मुस्लिम मतदार", अर्चना पाटील नेमकं काय म्हणाल्या?

'सियाला लोहगडावरुन ढकलून द्या'

दरम्यान, केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिच्या आई-वडिलांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. जर सिया दोषी असेल तर तिलाही लोहगडावरुन ढकलून द्या अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. यामुळे या प्रकरणाला एक वेगळे वळण मिळाले असून पोलीस या सर्व बाजूंची सखोल तपासणी करत आहेत.