VIDEO: 'आईच्या गां%$ गेलं, गां%# बोट घालतात..', शिंदे गटात गेलेल्या संजय पाटलांची घाणेरडी भाषा, कॅमेऱ्यात सगळं कैद

Sanjay Dina Patil Video: शिवसेना UBT पक्षाकडून निवडून आल्यानंतर त्यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची साथ धरलेल्या ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांना शिव्या दिल्या आहेत. ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे.

shinde shiv sena mp sanjay dina patil ranted hurled filthy abuse at journalists and issued threats full video

Sanjay Dina Patil Video

मुंबई तक

• 05:17 PM • 25 Jun 2026

follow google news

मुंबई: शिवसेना UBT चे मुंबईतील फुटीर खासदार संजय दीना पाटील (Sanjay Dina Patil) यांनी आज (25 मार्च) पत्रकारांशी बोलताना त्यांना अचानक शिवीगाळ सुरू केली. ऑपरेशन टायगरपासून पत्रकार सातत्याने संजय दिना पाटील यांची भूमिका आणि त्यांचे पुढील राजकीय निर्णय याबाबत जाणून घेऊन त्या बाबी जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, या सगळ्यामध्ये संजय पाटलांचा आज अचानक तोल गेला आणि त्यांनी अत्यंत घाणेरड्या भाषेत पत्रकारांनाच शिविगाळ करत अभद्र भाषेचा वापर केला.

हे वाचलं का?

संजय दिना पाटील यांच्याकडून शिविगाळ.. पाहा नेमकं काय म्हणाले

पत्रकारांशी बोलताना संजय दिना अचानक संतापले आणि म्हणाले, 'बोललोय.. समोर जे आहे ते जाणार ना.. जे करणार, बघा.. जे करणार ते भोगणार. अरे भाई कशाला.. बस झालं ना.. तुला बोललो 2 मिनिटं बोलायचं होतो.. बोलणारच नव्हतो.. बोललो ना भाई आता, कशाला आता करतोय.. चल बस माझ्या बरोबर.. बस ना गाडीत.. जेवढं बोलायचं तेवढं बोलू चला.. कशाला? इज्जत देतो भाई घे ना यार.. कशाला'

हे ही वाचा>> 'परत आला तर मारुन पाठवणार...' खासदार संजय दीना पाटलांची पत्रकारांना थेट धमकी

'जरा माझं हे बघू नका तुम्ही, अति करताय तुम्ही.. ये भाई बंद कर ना.. बंद कर नाहीतर भाई मी विसरून जाईल मी खासदार आहे आणि तुम्ही काय आहात. पहिलं पण सांगितलंय मी.. मामा बाजू हो..' 

'इज्जत करतोय, इज्जत करा.. सांगतोय परत.. तुम्ही उगाच माझा गां%# बोट घालतात.. रेकॉर्ड कर, इज्जत करतोय उगाच डोक्यात जाऊ नका.. उगाच डोक्यात जाऊ नका.. घराखाली उभा ठेवतोय तुम्हाला, जेवायलो देतोय. काय उगाच त्यांच्याकडे जाल. ते बोलतात ना.. मी बोलणारा नाहीए.'

'आता परत आले तर मारून पाठवणार तुम्हाला पण.. जे लिहायचं ते लिहा.. लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा.. तिकडे कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा. इज्जत करतोय, सहन करतोय तुम्हाला.. खूप दिवस सहन केलं तुम्हाला. मग अजून कशाला गां%$ घुसताय?'

'अरे लिमिट आहे कुठल्या गोष्टीची.. बोललीय ना ती, सांगितलंय ना सर्व.. त्यांनी काही बोलू दे.. अरे काही बोलू दे, आईच्या गां%$ गेलं.. आणि येऊ नका माझ्याकडे काही घ्यायला. आलं तर मारणार आता..

रेकॉर्ड करा आणि सांगा.. तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर.. काय करायची ते कंप्लेंट कर.. पोलीस आहेत त्यांच्या समोर सांगतोय. बस्स झालं सहन केलं खूप.. तुम्हाला उभं नाही करायचं इकडे, तुम्हाला जेवायला देतो मी इकडे..'

हे ही वाचा>> '...तेव्हा 5 लोकं मारलेली आम्ही', संजय दिना पाटलांचं धक्कादायक विधान, का बोलून गेले असं?

'घरापर्यंत आले तुम्ही माझ्या. एक कॅमेरावाला घरात आला माझ्या. घरात माझे बायका-मुलं झोपले होते, माझी सूनबाई झोपलेली आहे तरी घरात गेले, घरात रेकॉर्डिंग केली.. काही लिमिट आहे ना..' अशा मुजोर आणि अत्यंत शिवराळ भाषेत संजय दिना पाटलांनी पत्रकारांना धमकविण्याचा प्रयत्न यावेळी केला. 

एकनाथ शिंदेंकडून संजय दिना पाटलांचा बचाव 

ठाकरे गटाचे फुटीर खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकरांशी बोलताना अपशब्द वापरले. त्यांच्या अपशब्दानंतर आणि पत्रकारांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मी संजय दीना पाटील यांच्यासोबत बोललो आहे. त्यांनी माझ्याकडे भावना व्यक्त केली, की पत्रकारांबाबत चुकीची वक्तव्य करायची माझी अजिबातच इच्छा नव्हती. मी पत्रकारांच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. जे रोज त्यांच्या विरोधात बोलतात. तोडून टाका, मारून टाका, घरात घुसा आणि अतिशय खालच्या दर्जाचे निच मीडियासमोर शब्द वापरतात. हा मीडियाचा देखील अवमान आहे, याचा राग संजय दीना पाटील यांना आला'. असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय दिना पाटलांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.